तब्बल 10 वर्षांपासून वीज जोडणी नाही, शेवटी विहिरीत उतरून आत्महत्येचा प्रयत्न, औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार
महावितरण कार्यालयात जाऊन तसेच कोटेशन भरूनही वीज जोडणी मिळत नसल्यामुळे एका शेतकऱ्याने विहिरीत उतरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. विकास विठ्ठल चव्हाण असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
औरंगाबाद : महावितरण कार्यालयात जाऊन तसेच कोटेशन भरूनही वीज जोडणी मिळत नसल्यामुळे एका शेतकऱ्याने विहिरीत उतरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. विकास विठ्ठल चव्हाण असे या शेतकऱ्याचे नाव आहे. वैजापूर तालुक्यातील वजनापूर येथील हा शेतकरी आहे. (Aurangabad Vaijapur farmer tried to suicide for electricity connection)
नेमका प्रकार काय आहे ?
राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला वीज उपलब्ध व्हावी म्हणून राज्य सरकारकडून महावितरण आपल्या दारी ही योजना राबवली जाते. याच योजनेंतर्गत आपल्या शेतात वीज जोडणी मिळावी म्हणून वैजापूर तालुक्यातील वजनापूर येथील शेतकरी विकास चव्हाण यांनी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी महावितरणकडे कोटेशनदेखील भरले. एवढी सारी कायदेशीर प्रक्रिया करूनही वीज जोडणी न मिळाल्यामुळे विकास चव्हाण शेवटी हताश झाले. त्यानंतर होऊन शेवटचा पर्याय म्हणून चव्हाण यांनी थेट विहिरीत उतरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
मागील 10 वर्षांपासून विजेपासून वंचित
शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध व्हावी म्हणून विकास चव्हाण यांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली. तसेच वीज जोडणीसाठी आवश्यक असलेले कोटेशनसुद्धा त्यांनी भरले. मात्र, तरीदेखील त्यांना महावितरणची वीज मिळालेली नाही. एक किंवा दोन नव्हे कित्येक दिवसांपासून ते वीज जोडणीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, अजूनही महावितरणने त्यांना वीज उपलब्ध करुन दिलेली नाही. विकास चव्हाण यांना मागील दहा वर्षापासून वीज मिळालेली नाही.
महावितरण आपल्या दारी या योजनेचा बोजबारा उडाला
दरम्यान, महावितरणच्या कार्यालयात जाऊनही काम होत नसल्याने शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचा आरोप इतर शेतकऱ्यांकडून केला जातोय. तसेच सरकारच्या महावितरण आपल्या दारी या योजनेचा बोजबारा उडल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
इतर बातम्या :
औरंगाबाद शहरात सक्तीचे लसीकरण ? 21 जूनपासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे नियोजन
फिरायला जाताय? मग पर्यटन राजधानी तुमच्यासाठी खुली!, कोणती पर्यटनस्थळं सुरु?
(Aurangabad Vaijapur farmer tried to suicide for electricity connection)