Heat Wave | पारा चढतोय, आरोग्य सांभाळा, उष्णतेच्या लाटेचा तडाखा मराठवाड्याला, वाचा कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

राज्यातील उष्णतेच्या लाटेच्या तडाख्यात मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे येतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात अहमदनगर, सोलापूर, जळगाव या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील औरंगाबाद, हिंगोली, परभणी, जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे.

Heat Wave | पारा चढतोय, आरोग्य सांभाळा, उष्णतेच्या लाटेचा तडाखा मराठवाड्याला, वाचा कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
राज्यात उष्णतेची लाट Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 5:51 PM

औरंगाबादः राज्यातील उष्णतेच्या लाटेचा (Heat wave) तडाखा विदर्भ आणि मराठवाड्यातील (Marathwada) जिल्ह्यांना जास्त बसतोय. चंद्रपुरात देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान असल्याची नोंद झाली आहे तर औरंगाबादचा (Aurangabad) पाराही वाढतच आहे. मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत तापमानाचा पारा चाळीशीच्या पुढे गेला आहे. तर किमान तापमानातही चांगलीच वाढ झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज काही ठिकाणी 41 अंश सेल्सियसपर्यंत तापमान नोंदवले गेले तर मराठवाड्यात सर्वाधिक तापमान नांदेड येथे नोंदवले गेले. वायव्य, मध्य आणि पश्चिम भारतात निर्माण झालेल्या उष्णतेच्या लाटेचा परिणाम राज्यात दिसत असून पुढील तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहिल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

राज्यातील उष्णतेच्या लाटेच्या तडाख्यात मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे येतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात अहमदनगर, सोलापूर, जळगाव या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील औरंगाबाद, हिंगोली, परभणी, जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. पुढील तीन दिवस या जिल्ह्यांतीन नागरिकांनी थेट उन्हात जाणे टाळावे, असा सल्ला हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. मुंबई आणि कोकणात मात्र या उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवणार नाही, असं विभागाने सांगितले आहे.

मराठवाड्यातील जिल्ह्यांचे आजचे तापमान

मराठवाड्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांचं तापमान आज पुढील प्रमाणे नोंदवण्यात आलं.

औरंगाबाद- कमाल 40.2 अंश सेल्सियस परभणी- कमाल 41.6 अंश सेल्सियस नांदेड- कमाल 41.6 अंश सेल्सियस उस्मानाबाद-कमाल 40.2 अंश सेल्सियस लातूर-कमाल 38 अंश सेल्सियस हिंगोली- कमाल- 41 अंश सेल्सियस

चंद्रपुरात पारा 44 अंशांवर

मराठवाड्याप्रमाणेच विदर्भालाही उष्णतेच्या लाटेचा फटका बसत आहे. चंद्रपुरातील आजचं तापमान 44 अंश सेल्सियस एवढं नोंदवण्यात आलं आहे. उद्या हे तापमान 45 अंश सेल्सियस पर्यंत जाईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसेच अकोल्यातील तापमान 43 तर नागपूरमधील तापमान 42 अंश सेल्सियस पर्यंत पोहोचले आहे.

इतर बातम्या-

Pune | वीज कर्मचाऱ्यांचा फटाके फोडून आनंद साजरा

IPL 2022 Orange Cap and Purple Cap list: ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर कोण?

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.