औरंगाबादच्या बछड्यांचं थाटा-माटात बारसं…. कुर्र करायला आल्या सुप्रिया ताई.. पाच बछड्यांना नावं काय दिली?

शहरातील नागरिकांनी समृद्धीच्या बछड्यांसाठी सुचवलेल्या 200 नावांतून पाच नावं निवडण्याचा मान खासदार सुप्रिया सुळे यांना मिळाला. ही पाच नावं निवडल्यानंतर ते नाव सूचवणाऱ्यांचे नावही जाहीर करण्यात आले.

औरंगाबादच्या बछड्यांचं थाटा-माटात बारसं.... कुर्र करायला आल्या सुप्रिया ताई.. पाच बछड्यांना नावं काय दिली?
सिद्धार्थ उद्यानातील समृद्धी वाघिणीच्या बछड्यांचा नामकरण सोहळा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पार पडला.
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 9:14 AM

औरंगाबाद: शहरातील प्रसिद्ध सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील समृद्धी वाघिणीच्या पाच मादी बछड्यांचं नामःकरण नुकतंच मंगळवारी सुप्रिया सुळे यांच्या हस्ते थाटामाटात झालं. मंगळवारी म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी सुप्रिया ताईंच्या विशेष उपस्थितीत हा सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या पाच बछड्यांची नावं सूचवण्याचं आवाहन शहरातील नागरिकांना करण्यात आलं होतं. याला नागरिकांमधूनही भरपूर प्रतिसाद मिळाला.

औरंगाबादकरांनी सूचवली ‘समृद्धी’च्या बछड्यांची नावं

सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील समृद्धी वाघिणीच्या पाच मादी बछड्यांची नावं प्रशासनाने ठेवण्याऐवजी ही संधी औरंगाबादमधील नागरिकांना दिली. कारण सिद्धार्थ उद्यानातील प्राण्यांशी इथल्या शहरवासियांचंही एक जिव्हाळ्याचं नातं आहे. कोरोनामुळे नागरिक प्राणी संग्रहालयात जाऊ शकत नसले तरीही इथल्या प्राण्यांशी त्यांचं आत्मीयतेचं नातं आहे. इथले वाघ तर विशेष प्रसिद्ध आहेत. त्यामुळे औरंगाबादकरांनाच या बछड्यांची नावं सूचवण्याच मान देण्यात आला होता. त्यानुसार नागरिकांनी पाच बछड्यांसाठी सुमारे 200 नावं सूचवली होती.

चिठ्ठी काढून ताईंनी निवडली नावं

डिसेंबर 2020 मध्ये सिद्धार्थ उद्यानातील शहरातील नागरिकांनी समृद्धीच्या बछड्यांसाठी सुचवलेल्या 200 नावांतून पाच नावं निवडण्याचा मान खासदार सुप्रिया सुळे यांना मिळाला. ही पाच नावं निवडल्यानंतर ते नाव सूचवणाऱ्यांचे नावही जाहीर करण्यात आले. ती बछड्यांची नावं पुढीलप्रमाणे- 1) जिजाई (सूचक: रामदास बोराडे) 2) प्रतिभा (सूचक विठ्ठलराव देवकर) 3)वैशाली (सूचक: अथर्व चाबुकस्वार) 4) रंजना (सूचक; कुसुम दिवाकर) 5) रोहिणी (सूचक: पूर्वा पाटील)

महापालिका प्रशासकांच्या कामांचेही कौतुक

समृद्धीच्या बछड्यांचा नामःकरण सोहळा झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी बछडे आणि इतर वाघांची पाहणी केली. यावेळी वाघांचे केअर टेकर मोहम्मद जिया आणि एसबीआय बँक यांनी वाघ दत्तक घेतल्याबद्दल उप प्रबंधक दत्ता प्रसाद पवार यांचा सत्कार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी बछड्यांना नाव देण्याची अतिशय गोड संधी दिल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांचे आभार मानले. तसेच शहरात त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या कामांचेही मुक्त कंठाने कौतुक केले.

अशी गोड संधी एकदाच मिळते- सुप्रिया सुळे

यावेळी कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”वाघ हा माझा आवडता प्राणी असून मी दरवर्षी वाघ बघण्यास ताडोबाला जात असते. पण आज जी गोड संधी मला मिळाली ही आयुष्यात एकदाच मिळते. या कार्यक्रमाची मला सदैव आठवण राहतील आणि मला ही संधी दिल्याबद्दल मी पांडेय यांचे आभार मानते”, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. या नामःकरण सोहळ्यात महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय,पोलीस अधीक्षक(लोहमार्ग) मोक्षदा पाटील, अतिरिक्त आयुक्त बी बी नेमाने, शहर अभियंता एस डी पानझडे, उप आयुक्त सौरभ जोशी, प्रभारी प्राणी संग्रहालय संचालक डॉ शेख शाहेद,सेवानिवृत्त संचालक डॉ बी एस नाईकवाडे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ नितिसिंह चव्हाण, एसबीआय उप प्रबंधक दत्ता प्रसाद पवार आदींची उपस्थिती होती. (Babies of tigress got name by MP Supriya Sule, in Siddhart Garden Aurangabad)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.