AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडः समृद्ध जीवन मल्टिस्टेटच्या महेश मोतेवारला आज कोर्टात हजर करणार, 50 कोटींच्या लुटीचे प्रकरण!

बीडमध्ये समृद्ध जीवन मल्टीस्टेटच्या माध्यमातून कोट्यवधींची फसवणूक झाल्याप्रकरणी महेश मोतेवार याची आज पोलीस कोठडी संपत आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

बीडः समृद्ध जीवन मल्टिस्टेटच्या महेश मोतेवारला आज कोर्टात हजर करणार, 50 कोटींच्या लुटीचे प्रकरण!
कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी बीडमध्ये आज महेश मोतेवार याला न्यायालयात हजर केले जाणार
Follow us
| Updated on: Nov 30, 2021 | 11:43 AM

बीडः देशभरात समृद्ध जीवन मल्टिस्टेट सोसायटीच्या माध्यमातून कमी काळात अधिक गुंतवणुकीचे अमिष दाखवून हजारो नागरिकांना गंडा घालणाऱ्या महेश मोतेवार (Mahesh Motewar) याची पोलीस कोठडी आज संपत आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. सोमवारी पोलिसांच्या पथकाने पुण्यात जाऊन त्याच्या घराची झडती घेतली. मात्र त्यात कोणताही पुरावा सापडला नाही. बीड जिल्ह्यातील हजारो जणांची फसवणूक करून तब्बल 50 कोटी रुपयांचा गंडा (Fraud) घातल्याचा आरोप महेश मोतेवार (Mahesh Motewar) याच्यावर आहे.

समृद्ध जीवन मल्टिस्टेच्या नावाखाली फसवणूक

2010 मध्ये समृद्ध जीवन मल्टिस्टेटच्या नावाखाली महेश मोतेवार याने देशभरात एजंटाचे जाळे तयार केले. कमी कालावधीत पैशांच्या गुंतवणुकीवर अधिक व्याजदाराने परतावा देण्याचे आमिष दाखवत त्याने कोट्यवधींच्या ठेवी जमवल्या होत्या. 2017 पर्यंत शाखा सुरळीत चालल्यानंतर एक दिवस अचानक शाखेला कुलूप लागले. जिल्ह्यातील हजार जणांचे 50 कोटींहून अधिक रुपये त्यात अडकले.

घर, कार्यालये सील, पण पुरावे हाती नाहीत!

ईडीने यापूर्वीच महेश मोतेवार याचे बीडमधील घर आणि कार्यालय असलेले 11 गाळे सील केले आहेत. शहर पोलिसात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुमारे चार वर्षानंतर शहर पोलिसांनी राजकोट कारागृहातून मोतेवार याला ताब्यात घेतले. त्याला सुरुवातीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर 30 नोव्हेंबरपर्यंत कोठडीत वाढ करम्यात आली होती. या प्रकरणी शहर पोलिसांनी संचालक मंडळाची यादी मागितली होती. मात्र ही यादी त्यांना मिळालेली आहे.

इतर बातम्या-

आ देखें ज़रा किसमें कितना है दम; नवाब मलिक यांचं प्रवीण दरेकरांना ओपन चॅलेंज

प्रतिस्पर्धी टोळीशी हातमिळवणीचा संशय, नागपुरात कुख्यात गुंडाकडून मेकॅनिकची हत्या

पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला.
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही.
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला.
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा...
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा....
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे.
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला.
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर.
भारतानं या 9 ठिकाणचे पाकचे हल्ले उधळले अन् 7 मिसाईलचा चुराडा बघा VIDEO
भारतानं या 9 ठिकाणचे पाकचे हल्ले उधळले अन् 7 मिसाईलचा चुराडा बघा VIDEO.
भारतावर हल्ल्याची खुमखुमी पाकिस्तानला भोवली, रात्रभर काय घडलं?
भारतावर हल्ल्याची खुमखुमी पाकिस्तानला भोवली, रात्रभर काय घडलं?.
भारतावर हल्ल्याची खुमखुमी अन् पाकची जिरवली..चायना मेड विमानांचा चुराडा
भारतावर हल्ल्याची खुमखुमी अन् पाकची जिरवली..चायना मेड विमानांचा चुराडा.