औरंगाबादः साताऱ्यातील दुसऱ्या जलकुंभाचे भूमिपूजन, दीड वर्षाच्या आत रहिवाशांना नळाचे पाणी मिळेलः आ. शिरसाट
सातारा आणि देवळाी परिसरातील अनेक विकासकामे रखडलेली आहेत. ती लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती आमदार शिरसाट यांनी दिली.
औरंगाबादः शहरातील 1680 कोटी रुपयांच्या नव्या पाणीपुरवठा योजनेत सातारा-देवळाई भागात 8 मोठे जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी साताऱ्यातील नाथ टॉवरजवळ बांधण्यात येणाऱ्या दुसऱ्या जलकुंभाचे भूमिपूजन शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या भागातील नागरिकांना येत्या दीड वर्षात नळाचे पाणी मिळेल, असे आश्वासन आमदार शिरसाट यांनी याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.
दीड वर्षात रहिवाशांना नळाचे पाणी मिळणार
सातारा देवळाई भाग हा नुकतास महापालिकेत समाविष्ट झाला असून येथील नागरिकांना अद्याप नळाद्वारे पाणीपुरवठ्याची सोय झालेली नाही. जलकुंभाच्या भूमीपूजनप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना संजय शिरसाट म्हणाले, ‘ सातारा आणि देवळाी परिसरातील अनेक विकासकामे रखडलेली आहेत. ती लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिक हा माझ्या परिसरातील सदस्य आहे. या सर्व नागरिकांना हक्काचे घर आणि पाण्याची सुविधा मिळावी, हा माझा हेतू आहे. गुंठेवारी व कर यासंदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक घेऊन हा प्रश्न लवकरच सोडवला जाईल, असे आश्वासहनी संजय शिरसाट यांनी दिले.
या वेळी उपशहरप्रमुख रमेश बाहुले, विभागप्रमुख रणजित ढेपे, हरिभाऊ हिवाळे, उपविभागप्रमुख संतोष जाटवे, शाखाप्रमुख ईश्वर पारखे, दीपक सूर्यवंशी, प्रवीण मोहिते, शिवाजी शिंदे, संजय भुजबळ, बाळू मिसाळ, गजानन पाटील, अभिजित देशमुख, अजिंक्य गायकवाड, पंकज शिंदे, कैलास काळे, गणेश औटे, मदन गवळी, मिलिंद शिंदे, अरुण गुलाणे, नाना सोनवणे, अप्पा साळुंके, प्रा. स्मिता अवचार, माधवी पाठक, ज्योती मचाले, सना मुंडे आदींची उपस्थिती होती.
1680 कोटी रुपयांची नवी योजना
महाविकास आघाडी सरकारने शहरासाठी 1680 कोटी रुपयांनी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे काम सुरु आहे. आहे. जेव्हीपीआर या हैदराबाद येथील कंपनीला जलवाहिनीचे काम देण्यात आले आहे. त्यानुसार कंपनीने सहा महिन्यापूर्वीच शहरात कामाला सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत शहरात 15 जलकुंभ उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून आणखी 5 जलकुंभाचे काम सुरु करण्यात आले आहे.
शहरातच तयार होणार पाइप
या जलवाहिनीच्या योजनेत जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत 8 फूट व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या पाइपची लांबी आणि रुंदी खूप जास्त असल्याने तो इतर ठिकाणाहून वाहून आणण्यास प्रचंड त्रास झाला असता. त्यामुळे योजनेसाठी लागणारे पाइप शहरातच तयार केले जाणार आहेत. यासाठी नक्षत्रवाडीजवळ पाइप तयार करण्याची फॅक्ट्रीदेखील उभारण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सुमारे 90 हजार घरगुती नळजोडण्या दिल्या जातील.
इतर बातम्या-