Elections: औरंगाबादेत नगरपंचायत निवडणुकीत अनेक इच्छुकांचे अर्ज दाखल, सोयगावात 17 जागांसाठी 90 अर्ज
राज्यातील विविध नगरपंचायतींच्या निवडणूका तसेच पोट निवडणुकांच्या प्रक्रियेला वेग आला असून विविध इच्छुकांनी आपले भवितव्य आजमावून पाहण्यासाठी अर्ज भरले आहेत. आता 13 डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. औरंगाबादमधील फुलंब्री, सोयगाव, सिल्लोडमध्येही निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

औरंगाबादः जिल्ह्यातील सोयगाव (Soygaon election) नगरपंचायतीच्या निवडुकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी तब्बल 58 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे आता सोयगावच्या निवडणुकीत 17 जागांसाठी एकूण 90 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी संजीव मोरे यांनी दिली. तसेच सिल्लोड आणि फुलंब्री येथेही नगरपंचायतीच्या पोट निवडणुकांसाठी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. 13 डिसेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे.
पोर्टल बंद असल्यामुळे इच्छुकांचा हिरमोड
नगर पंचायत निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज स्वीकृतीसाठी दुपारी तीनऐवजी दोन तास कालावधी वाढवून पाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वाढवून दिला. दुपारी दोन वाजेपासूनच ऑनलाइन अर्जासाठीचे संकेतस्थळ बंद करण्यात आल्याने दिलेल्या कालावधीचा इच्छुकांना उपयोग झाला नाही. त्यामुळे ऐनवेळी इच्छुकांची निराशा झाली.
शेवटच्या दिवशी 58 अर्ज, कोणत्या पक्षाचे किती?
सोयगाव नगरपंचायतीकरिता शेवटच्या दिवशी 58 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले. त्यात शिवसेना-17, भाजपा- 17, प्रहार- 1, काँग्रेस- 13, राष्ट्रवादी- 8 आणि वंचित बहुजन आघाडी- 2 याप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल झाले.
फुलंब्रीत दोन जागांसाठी पोटनिवडणूक
फुलंब्री येथील नगरपंचायतीच्या दोन जागांसाठी 21 डिसेंबर रोजी पोट निवडणूक होत आहे. यासाठी 15 जणांनी 16 उमेदवारी अर्ज भरले आहेत. यात 11 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. महाविकास आघाडी व भाजप उमेदरांमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळणार आहे. फुलंब्री नगरपंचायतीतील दोन नगरसेवकांविरोधातील शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर या जागा रिक्त झाल्या होत्या. त्यांच्यासाठी ही पोटनिवडणूक होत आहे.
सिल्लोडमध्ये एका जागेसाठी 11 अर्ज
सिल्लोड नगर परिषदेच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 10 जणांनी 11 उमेदवारी अर्ज दाखल केले. 13 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
इतर बातम्या-