औरंगाबादेत गांजाची शेती, 303 झाडांसह 9 लाख रुपये जप्त, गुन्हा दाखल

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे एका शेतकऱ्याने तुरीच्या शेतात गांजा लावला होता. हा कारनामा त्याला चांगलाच महागात पडला आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तब्बल 157 किलो गांजा तसेच तब्बल 9 लाख रुपये जप्त केले आहेत. आर्थिक फायद्यासाठी गांजाची लागवड मोठा आर्थिक फायदा व्हावा यासाठी वैजापूरमधील एका शेतकऱ्याने चक्क तुरीच्या शेतात गांजा […]

औरंगाबादेत गांजाची शेती, 303 झाडांसह 9 लाख रुपये जप्त, गुन्हा दाखल
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 8:50 PM

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे एका शेतकऱ्याने तुरीच्या शेतात गांजा लावला होता. हा कारनामा त्याला चांगलाच महागात पडला आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तब्बल 157 किलो गांजा तसेच तब्बल 9 लाख रुपये जप्त केले आहेत.

आर्थिक फायद्यासाठी गांजाची लागवड

मोठा आर्थिक फायदा व्हावा यासाठी वैजापूरमधील एका शेतकऱ्याने चक्क तुरीच्या शेतात गांजा लावला होता. गांजाचे वितरण तसेच उत्पादनावर बंदी असूनदेखील या शेतकऱ्याने अवैध पद्धतीने गांजाची शेती केली होती. या कारनाम्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली. नंतर पोलिसांनी कारवाई करून या शेतकऱ्याकडून तब्बल 157 किलो गांजा पकडला. तसेच 303 गांजाची झाडे हस्तगत करून नऊ लाख रुपयांपेक्षाही जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पैशांच्या हव्यासापोठी गांजा लागवड करणाऱ्या या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

9 ऑक्टोबर रोजी 39 किलोचा गांजा पकडला

तर दुसरीकडे औरंगाबाद शहरात 9 ऑक्टोबर रोजी रेल्वे स्थानकावर (Aurangabad Railway Station) आलेला 39 किलोचा गांजा उस्मानपुरा पोलिसांच्या पथकाने पकडला होता. औरंगाबादेत शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही कारवाई  करण्यात आली होती. या कारवाईत दोन महिलांसह एका पुरुषाला अटक करण्यात आले होते. आंध्रप्रदेशातील (Andhra Pradesh) विशाखापट्टणम् येथून हा गांजा औरंगाबादेत आणला गेल्याचे पोलिसांच्या (Aurangabad Police) चौकशीअंती समोर आले होते.

2 लाख 73 हजार रुपये किंमतीचा गांजा

विशाखापट्टणम् येथून आलेला हा गांजा सुमारे 2 लाख 73 हजार रुपये किमतीचा होता. अटक केलेल्या आरोपींमध्ये गोविंदा मनी आरली, लाऊ अम्मा रामू आरली आणि मनय्या अप्पाराव पिल्ले यांचा समावेश होता. तीन आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती.

गांजा शेतीचा सूत्रधार कोण?

दरम्यान, मागील दोन वर्षांमध्ये नारेगाव, सिटी चौक, जिन्सी परिसरात विशाखापट्टणमवरून येणारा मोठा गांजा पकडला गेला. शहरातील मातब्बर तस्करांनी विशाखापट्टणम येथे बटाईने गांजाची शेती केली आहे. यापूर्वीच हा प्रकार लक्षात आला आहे. तस्करांनी वेगवेगळी शक्कल लढवूनही शहर पोलिसांनी हा गांजा पकडल्याने मध्यंतरीच्या काळात तस्करांच्या रॅकेटवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे आता रेल्वेद्वारे प्रवासी म्हणून मजुरांना पाठवून तस्करी सुरू केली. यात सदर प्रवासी रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर त्यांना बाबा चौकात उतरण्यास सांगितले जाते. त्यानंतर दुसऱ्या रिक्षात बसण्यास सांगून सदर एजंट रिक्षाचालकाला थेट पत्ता सांगून त्यांना तेथे घेऊन येण्यास सांगतो. पहिल्यांदाच गांजा तस्करीचा हा प्रकार समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

इतर बातम्या :

चालत्या कारची स्टेअरिंग अचानक लॉक झाली आणि महिला डॉक्टरने जीव गमावला, नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री?

श्रीरामांच्या विरहात दशरथ राजाने मंचावर प्राण सोडला, ‘रामलीला’त चटका लावून जाणारी खरी एक्झिट, सहकलाकार-प्रेक्षकांचा आक्रोश

Uttar Pradesh | जमिनीच्या वादाने डोकं भडकलं, दिराने भावजयीच्या डोक्यात फावडा घातला; हत्येच्या घटनेने खळबळ

(Cannabis farming in aurangabad police seize 9 lakh rupees and 303)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.