लसीसाठी सोशल डिस्टन्स ठेवून चप्पल रांगेत, औरंगाबादकरांची शक्कल, स्वत: सावलीत घोळका

औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा लसीकरणासाठी (Aurangabad vaccination) गर्दी झाल्याचं चित्र आहे. मात्र आज औरंगाबादकरांनी रांग लावण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. सोशल डिस्टन्समध्ये प्रत्यक्ष उभं राहण्याऐवजी, रांगेत चप्पल ठेवण्यात आली.

लसीसाठी सोशल डिस्टन्स ठेवून चप्पल रांगेत, औरंगाबादकरांची शक्कल, स्वत: सावलीत घोळका
Aurangabad corona vaccine que
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 10:52 AM

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा लसीकरणासाठी (Aurangabad vaccination) गर्दी झाल्याचं चित्र आहे. मात्र आज औरंगाबादकरांनी रांग लावण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. सोशल डिस्टन्समध्ये प्रत्यक्ष उभं राहण्याऐवजी, रांगेत चप्पल ठेवण्यात आली. आपला नंबर आल्यानंतर चपलाजवळ येऊन ती पुढे सरकवायची असा प्रकार करण्यात येत आहे. चपला रांगेत आणि संबंधित व्यक्ती सावलीत, असं चित्र आज औरंगाबादेत पाहायला मिळालं. (Chappals in queue for corona vaccine at Aurangabad Maharashtra)

राज्यात जसा लसींचा तुटवडा जाणवत आहे, तसाच औरंगाबादमध्येही आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर मोठमोठ्या रांगा लागत आहेत. काल तर औरंगाबादेतील लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरीची परिस्थिती होती. अनेकजण पहाटेपासून रांगा लावत आहेत, मात्र त्यांना विनालस घेता परतावं लागत आहे.

लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर एरव्ही ओस पडलेल्या लसीकरण केंद्रांवर आता मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे धक्काबुक्की ,रेटारेटी झाल्याचा प्रकार वाळूजमध्ये 28 जून रोजी पहायला मिळाला. यात काही लोकांना किरकोळ इजासुद्धा झाली. या लसीकरण केंद्रावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. मात्र पोलिसांनाही इथली गर्दी हाताळता आली नाही. वाळूजमधील बजाजनगर लसीकरण केंद्रावर आज नियोजनाचा मोठा अभाव पाहायला मिळाला. इथं झालेल्या गर्दीमुळे लोक लस घेण्यासाठी आले होते, पण त्यांना कोरोनाची लागण होण्याचीच शक्यता अधिक आहे, असं चित्र निर्माण झालं होतं.

टीव्ही 9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, नागरिकांना टोकनचे वाटप

लस तुटवडा निर्माण झाल्यामुळे रांग लावूनही टोकन मिळत नसल्यामुळे औरंगाबाद शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. टीव्ही 9 मराठीच्या बजाजनगर येथील लस तुटवड्याच्या बातमीनंतर आता येथे तत्काळ लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच नागरिकांना टोकन वाटण्यात आले असून काहींचे लसीकरण झाले.

VIDEO : महाफास्ट 100 बातम्या

संबंधित बातम्या 

टीव्ही 9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, औरंगाबादेत लसीकरणासाठी नागरिकांना टोकनचे वाटप

Video : लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरी! औरंगाबादच्या वाळूजमध्ये नागरिकांचे मोठे हाल

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.