मला जनतेचं प्रेम आणि आशिर्वाद; पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांनी मानले जनतेचे आभार
ज्या मार्गावरुन एकनाथ शिंदे यांचा ताफा निघाला आहे, त्याच मार्गावरुन आदित्य ठाकरेंचाही ताफा गेला असल्याचे सांगत त्यांच्यावेळीही प्रचंड गर्दी झाल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सध्या औरंगाबाद दौऱ्यावर असून आज त्यांची पैठणमध्ये सभा होत आहे. त्यानिमित्ताने पैठणमधील अनेक गावांमधून मुख्यमंत्री शिंदे यांचे जंगी स्वागत केले जात आहे. यावेळी परिसरातील महिलांकडूनही त्यांचे औक्षण केले जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला जनतेचं प्रेम आणि आशिर्वाद असल्याचे सांगत त्यांनी यावेळी त्यांनी जनतेचे आभारही मानले आहेत. औरंगाबाद दौऱ्यावर असतानाच त्यांची पेढेतुलाही केली जाणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. ज्या मार्गावरुन एकनाथ शिंदे यांचा ताफा निघाला आहे, त्याच मार्गावरुन आदित्य ठाकरेंचाही ताफा गेला असल्याचे सांगत त्यांच्यावेळीही प्रचंड गर्दी झाल्याचे त्यांनी सांगितले.