Cm Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या सभेचे टीझर रिलीज, औरंगाबादेत निशाणा कोण? इम्तियाज जलील म्हणतात, सौ सोनार की…

दुसऱ्याच दिवशी फडणवीसांची सभा झाली त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसेच काही दिवसांत पुण्यात राज ठाकरेंची सभा झाली. त्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या सभेवर सडकून टीका केली. मात्र आता शिवसेनेकडून औरंगाबादच्या सभेसाठी टीजर रिलीज करण्यात आल्या.

Cm Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या सभेचे टीझर रिलीज, औरंगाबादेत निशाणा कोण? इम्तियाज जलील म्हणतात, सौ सोनार की...
मुख्यमंत्र्यांच्या सभेचे टीझर रिलीजImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 5:41 PM

औरंगाबाद : राज्यात बॅक टू बॅक चार सभा घेत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) राज्यतलं राजकीय वातावरण तापवलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या बीकेसीतल्या (Cm Uddhav Thackeray) सभेचाही समाचार त्यांनी पुण्यातल्या सभेत घेतला. त्याच्या काही दिवस आधीच राज ठाकरेंची औरंगाबादेत (Aurangabad) हायव्होल्टेज सभा पार पडली होती. राज ठाकरेंनी ही संभा झाल्यानंतच जून महिन्यात मुख्यमंत्र्यांची औरंगाबादेत सभा होईल असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं. या सभेची घोषणाही झाली. तारीखही ठरली. येत्या 8 जूनला मुख्यमंत्र्यांची तोफ ही औरंगाबादेतून धडाडणार आहे. गेल्या बीकेसीतल्या सभेतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मनसेचा जोरदार समाचार घेतला होती. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीसांची सभा झाली त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसेच काही दिवसांत पुण्यात राज ठाकरेंची सभा झाली. त्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या सभेवर सडकून टीका केली. मात्र आता शिवसेनेकडून औरंगाबादच्या सभेसाठी टीजर रिलीज करण्यात आल्या.

सभेआधी टीझर व्हायरल

टीझरमध्ये नेमकं काय?

या टीझरच्या सुरूवातीलच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे स्टेजवर दिसत आहे. ते जाऊन मंचावर लोकांपुढे नतमस्तक होत आहेत. त्यानंतर या टिझरला बॅकग्राऊंडला आवाज हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा दिलाय. त्यात ते म्हणतात, तमाम हिंदू बांधवांनो, भगिणींनो आणि मातांनो, शिवसेना जात पात मानत नाही, शिवसेनेचा हा भगवा झेंडा डौलानं, जबरदस्त फडकत राहिलाच पाहिजे…राहिलाच पाहिजे…त्यानंतर या टीझरमध्ये कोण आला रे कोण आलाच्या घोषणांचा आवाज ऐकायला येत आहे. सत्ता असो वा नसो मला पर्वा नाही, पण आमचं हिंदू हे तकलादू नाही आमचं हिंदूत्व हे स्वच्छ आहे. असे उद्धव ठाकरे म्हणताना दिसतात. तर शेवटी या ट्रेलरच्या वाघाची डरकाळीही ऐकायला येत आहे. त्यामुळे आता टीझर हीट ठरलाय. शिवसैनिकांना प्रतीक्षा आहे, औरंगाबादेतल्या सभेची.

राज ठाकरे आणि फडणवीसांना उत्तर देणार?

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवासांच्या फरकाने सभा घेत मुख्यमंत्र्यांच्या सभेवर सडकून टीका केली होती. तसेच औरंगाबादच्या नामंतरावरूनही फडणवीस आणि राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली होती. मुख्यमंत्री म्हणतात मी बोलता संभाजीनगर म्हणजे झालं ना…तर ओ खैरे व्हा आता बहिरे असे म्हणत फडणवीसांनी हल्लाबोल चढवला होता. तर दुसरीकडे तु बोलला म्हणजे असे व्हायला तु काय सरदार पटेल आहेस का? तु कोण आहेस? असा सवाल राज ठाकरे यांनी पुण्यातून केला होता. त्यामुळे आता या दोघांनाही मुख्यमंत्री काय उत्तर देणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तसेच कालच खैरे म्हणाले आहेत नामांतराची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे या सभेत नामांतराची घोषणा होणार का? असा सवालही विचारण्यात येत आहे.

इम्तियाज जलीलही सभा घेणार

आम्ही शिवसेनेचे चॅलेंज स्वीकारायला तयार आहे. सगळ्यांच्या सभा झाल्यनंतर आम्ही सभा घेणार.. सौ सोनार की एक लोहार की…त्यांचे मुख्यमंत्री येऊ द्या ,त्यांची झाल्यावर आमची सभा घेऊ, आमच्या सभेला गाड्यांचा आणि पैशांच्या देवाण घेवनाची गरज नसणार, असे म्हणत इम्तियाज जलील यांनीही सभेची घोषणा केली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.