Samruddhi Highway | ‘समृद्धी’ तून होणार CNG लाइनची भरभराट, महामार्गालगतच्या 11 जिल्ह्यांना लाभ, 60 टक्के काम पूर्ण

तूर्तास 60 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरीत 40 टक्के काम आगामी चार ते पाच महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यानंतर स्थानिक स्तरावर गॅस वितरणाचे काम घेतलेल्या कंपन्यांकडून स्थानिक ठिकाणी काम सुरु होईल व नंतर नागरिकांना शहरात, जिल्ह्यात सीएनजीचे वितरण सुरु होईल, असे 'गेल' च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Samruddhi Highway | 'समृद्धी' तून होणार CNG लाइनची भरभराट, महामार्गालगतच्या 11 जिल्ह्यांना लाभ, 60 टक्के काम पूर्ण
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 6:00 AM

अमरावतीः मुंबई ते नागपूर (Mumbai Nagpur Samruddhi) महामार्गाचे काम मागील दोन वर्षांपासून वेगाने सुरु आहे. महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना जोडणाऱ्या या महामार्गामुळे दळणवळणाची गती वाढणार आहे. याच महामार्गालगत सीएनजी पाइपलाइन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सध्या सीएनजी पाइपलाइनचे (CNG Pipeline) काम 60 टक्के पूर्ण झाल्याची माहिती गेल अर्थात गॅस अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. अमरावतीसह समृद्धी महामार्ग ज्या जिल्ह्यांतून किंवा जिल्ह्यांच्या आजूबाजूने गेला आहे, त्या जिल्ह्यात आगामी काळात सीएनजी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता अनेक ठिकाणी सीएनजी अद्याप पोहोचला नाहीये. मात्र आता समृद्धीच्या कडेला असलेल्या पाइपलाइनद्वारे सीएनजी मिळणार आहे. त्यामुळे पेट्रोल (Petrol) आणि डिझेलला सक्षम पर्याय उपलब्ध असेल. तसेच गॅसवाहिनीला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दर 20 मीटर अंतरावर वॉल्व्हदेखील टाकण्यात येणार आहेत.

कोणत्या जिल्ह्यांना लाभ?

महाराष्ट्राचा महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, बुलडाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक व ठाणे या जिल्ह्यांतून गेलेला आहे. यापैकी औरंगाबाद, नागपूर, ठाणे, नाशिक व अहमदनगर वगळता कुठेही सीएनजीची योजना सुरु झालेली नाही. नागपूरसारख्या ठिकाणी सीएनजी मुंबई, पुण्यातून टँकरद्वारे वाहतूक करून पोहोचवला जातो. त्यामुळे अल्प प्रमाणात आहे, तसेच मुंबई पुण्याच्या तुलनेत दीडपट महाग आहे. गॅस पाइपलाइनद्वारे पुरवलेला सीएनजी पुरेशा प्रमाणात स्वस्त राहणार आहे. कारण पाइपलाइनमुळे वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होणार आहे.

‘गेल’द्वारे महामार्गालगत काम

समृद्धी महामार्गाला लागून टाकण्यात येत असलेल्या पाइपलाइनमधून 16 एमएमएससीएमडी इतका गॅस वहन करण्याची क्षमता आहे. गेल ही कंपनी देशभरात अशा प्रकारे पाइपलाइनद्वारे गॅस पोहोचवण्याचे काम करणारी यंत्रणा आहे. तूर्तास 60 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरीत 40 टक्के काम आगामी चार ते पाच महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यानंतर स्थानिक स्तरावर गॅस वितरणाचे काम घेतलेल्या कंपन्यांकडून स्थानिक ठिकाणी काम सुरु होईल व नंतर नागरिकांना शहरात, जिल्ह्यात सीएनजीचे वितरण सुरु होईल, असे ‘गेल’ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.

जिल्ह्यांतर्गत वितरणाची वेगळी व्यवस्था

नागपूरसाठी केसीई प्रायव्हेट लिमिटेड, वर्धा्यासाठी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोल्यासाठी अदानी टोटल गॅस, बुलडाण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड, जालन्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही कंपनी काम पाहणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.