“नरेंद्र मोदी यांची देशातून हवा संपत चालली”; मुंबई दौऱ्यावरून ठाकरे गटाच्या नेत्याने भाजपले छेडले

मुंबईमध्ये नरेंद्र मोदी जे काही उद्घाटन करणार आहेत. ती सगळी कामं उद्धव ठाकरे यांनी केलेली आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना कुठलंही यश येणार नाही असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले आहे.

नरेंद्र मोदी यांची देशातून हवा संपत चालली; मुंबई दौऱ्यावरून ठाकरे गटाच्या नेत्याने भाजपले छेडले
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 5:08 PM

औरंगाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहे, मात्र त्यांच्या या दौऱ्यावरून ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. मुंबईमधील विकासकामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होत असले तरी विकासकामावरून आता ठाकरे गट, काँग्रेसने श्रेयवादाचे राजकारणावरूनही जोरदार हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या या मुंबई दौऱ्यानिमित्ताने ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही जहरी टीका केली आहे.

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांनी नरेंद्र मोदी यांची संपूर्ण देशातून हवा संपत चालली असल्याचा हल्लाबोल करण्यात आला आहे.

हैदराबादमध्ये झालेल्या सभेत पाच मुख्यमंत्री आणि अनेक पक्ष सहभागी झाले होते. त्यामुळे 2024 ला नरेंद्र मोदी यांना मोठा राजकीय फटका बसणार आहे असा इशाराही त्यांनी दिला आहे.

भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून पंतप्रधानांचा मुंबई दौरा हा ठरवून काढलेला दौरा आहे. कारण आगामी काळात मुंबई महानगरपालिकच्या निवडणुका असल्या कारणाने मतदार भुलवण्यासाठीच नरेंद्र मोदी मुंबईत आले असल्याची टीकाही चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाकडून केले जात आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांना कोणतेही यश येणार नाही अशा स्वरूपाची प्रतिक्रिया शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.

मुंबईमध्ये नरेंद्र मोदी जे काही उद्घाटन करणार आहेत. ती सगळी कामं उद्धव ठाकरे यांनी केलेली आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना कुठलंही यश येणार नाही असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.