Aurangabad Gold: जेवढे सोने घेतले, तेवढी चांदी मोफत, पु.ना. गाडगीळच्या आकर्षक ऑफरला ग्राहकांचा प्रतिसाद

आज शहरात 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,270 रुपये प्रति तोळा एवढा सुरु आहे. तसेच चांदीचा भाव 65,800 रुपये प्रतिकिलो एवढा आहे. एकूण आजच्या दरात 400 रुपयांची घसरण पहायला मिळतेय.

Aurangabad Gold: जेवढे सोने घेतले, तेवढी चांदी मोफत, पु.ना. गाडगीळच्या आकर्षक ऑफरला ग्राहकांचा प्रतिसाद
पु. ना. गाडगीळ काल्डा कॉर्नरच्या शाखेत ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 4:33 PM

औरंगाबाद: गणपती-गौरीच्या आगमनाच्या मुहूर्तावर शहरात सोने-चांदीचे दागिने खरेदीत उत्साह पहायला मिळतोय. त्यातच शहरातील काल्डा कॉर्नर येथील पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या शाखेचा आज पहिला वर्धापन दिन असल्याने त्यांनी विशेष ऑफर ठेवली आहे. जेवढ्या वजनाचे सोन्याचे दागिने खरेदी केले, तेवढ्याच वजनाची शुद्ध चांदी ग्राहकांना मोफत दिली जात आहे. तसेच इतरही काही आकर्षक ऑफर्स आहेत. औरंगाबादेतील या ऑफर्सना ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती काल्डा कॉर्नरच्या पु.ना. गाडगीळ शाखेचे प्रमुख प्रीतम बोरा यांनी सांगितले. (Custermer’s great response in PNG Kalda corner branch, Aurangabad today’s gold rate)

ऑफर 31 ऑगस्टपर्यंत

विशेष म्हणजे सोमवारी (30 ऑगस्ट) रोजी सुटीच्या दिवशीही काल्डा कॉर्नरची शाखा सुरु राहणार आहे.ही ऑफर 31 ऑगस्टपर्यंतच असेल. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत ग्राहकांना दालनात सेवा दिली जात आहे.

आकर्षक दागिने व वस्तूंचे कलेक्शन

पु.ना. गाडगिळच्या शाखेत सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमसह नॉन सिल्व्हरचे गिफ्ट, तसेच नव्या शैलीची उत्पादने उपलब्ध आहेत. तसेच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवीन डिझाइनचा स्टॉकही दालनात ठेवण्यात आला आहे. आजच्या ऑफरमुळे काल्डा कॉर्नर येथील शाखेत सकाळपासून ग्राहकांचा ओघ सुरू आहे. ग्राहक खरेदी करत असलेल्या वस्तूंमध्ये प्रसिद्ध टेम्पस ज्वेलरी- गोकाक डिझाइनमधील नवीन प्रकार यांचा समावेश आहे. तसेच अँटिक ज्वेलरी, डिझायनर सेट, डायमंड नेकलेस, बँगल्सचे विविध प्रकारही येथे उपलब्ध आहेत.

आज सोने 400 रुपयांनी घसरले

आज शहरात 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,270 रुपये प्रति तोळा एवढा सुरु आहे. काल शनिवार आणि रविवारी सोन्याचे दर 400 रुपयांनी जास्त होते. 22 कॅरेट सोन्याचे दर काल 46,800 रुपये प्रति तोळा एवढा होता. तसाच चांदीचा भाव 65,800 रुपये प्रतिकिलो एवढा आहे. चांदीचे दरही कालच्या दरांपेक्षा 400 रुपयांनी घसरल्याचे चित्र आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येईल आणि त्यामुळे सोन्याचे दरही वाढतील, असा अंदाज आहे.

छोट्या व्यापाऱ्यांमध्ये उत्साह

दरम्यान, केंद्र सरकारकडून सोन्याच्या दागिन्यांसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या हॉलमार्किंगची मुदत वाढवण्याचा निर्णय शनिवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी 31 ऑगस्टपर्यंत सर्व दागिन्यांना हॉलमार्किंग करणे आवश्यक होते. आता ही मुदत 31नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे लहान सराफा व्यापारी या काळात हॉलमार्क नसलेले दागिनेही विकू शकतील. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि सराफ व्यापाऱ्यांमध्ये शनिवारी यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

इतर बातम्या- 

Aurangabad Weather: शहरात पावसाचा शिडकावा, वातावरणात गारवा, पुढचे 3 दिवस मध्यम पावसाचा अंदाज

Aurangabad Crime: मोबाइल दिला नाही म्हणून 12 वर्षाच्या मुलाला आला राग, नाराजीनं घरच सोडलं

सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.