संभाजी छत्रपती म्हणतात, प्रश्न विचारायचे असतील तर मुख्यमंत्री करा; आता धनंजय मुंडे म्हणाले…
मला प्रश्न विचारायचे असतील तर आधी मुख्यमंत्रीपदी बसवा, असं विधान खासदार संभाजी छत्रपती यांनी केलं. त्यामुळे संभाजी छत्रपती यांच्या मनात नेमकं काय चाललं यावर चर्चा होत आहे. (dhananjay munde)
परळी: मला प्रश्न विचारायचे असतील तर आधी मुख्यमंत्रीपदी बसवा, असं विधान खासदार संभाजी छत्रपती यांनी केलं. त्यामुळे संभाजी छत्रपती यांच्या मनात नेमकं काय चाललं यावर चर्चा होत आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी संभाजी छत्रपती यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही. चळवळ चांगली केली तरच चळवळीतील प्रश्न मार्गी लागतात, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. (dhananjay munde on Sambhaji Chhatrapati’s statement about Chief Minister post)
धनंजय मुंडे यांनी परळीत मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना संभाजी छत्रपती यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही. चळवळ चांगली केली तर चळवळीतील प्रश्नांना यश येतं. त्यामुळे मनात प्रामाणिकपणा असावा, पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नये, असं मुंडे म्हणाले.
वायफळ चर्चेला अर्थ नाही
यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. महाविकास आघाडीचे सरकार मराठा आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी सक्षमपणे कोर्टात लढणार आहे, असं ते म्हणाले. तर, विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार आहे. वायफळ चर्चेला काहीच अर्थ नाही, असं ते म्हणाले.
संभाजी छत्रपती काय म्हणाले होते?
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तुम्हाला मला जाब विचारायचा असेल तर आधी मला मुख्यंमंत्रीपदावर बसवा, असे वक्तव्य खासदार संभाजी छत्रपती यांनी केले होते. बीड दौऱ्यावर असलेल्या संभाजी छत्रपती यांचा शुक्रवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी प्रवेश केला. संभाजी छत्रपती व्यासपीठावर असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली.
त्यावेळी संभाजी छत्रपती यांनीही आपला रुद्रावतार दाखवला. त्यांनी उलट संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर शाब्दिक हल्ला केला. तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर आजी-माजी मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना विचारा. मात्र, त्यांच्याकडून तुम्हाला उत्तर मिळणार नाही. मला प्रश्न विचारायचे असतील तर प्रथम मला मुख्यमंत्री करा, असे संभाजी छत्रपती यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. मात्र, यानिमित्ताने संभाजीराजे यांच्या मनातील मुख्यमंत्रीपदाची इच्छा ओठावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. (dhananjay munde on Sambhaji Chhatrapati’s statement about Chief Minister post)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 3 July 2021 https://t.co/Be45klPCNm #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 3, 2021
संबंधित बातम्या:
“भाजपमधून बाहेर पडा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत”
VIDEO: मला प्रश्न विचारायचे असतील तर आधी मुख्यमंत्रीपदावर बसवा: संभाजीराजे छत्रपती
(dhananjay munde on Sambhaji Chhatrapati’s statement about Chief Minister post)