Sharad Pawar Aurangabad | अन् त्यांना मिळाली शरद पवारांसोबत थेट विमान प्रवासाची संधी, वाचा नेमके काय घडले!
शरद पवार यांनीही त्यांच्याशी संवाद साधला. त्याचवेळी मीही आता औरंगाबादला निघालोय. माझ्यासोबत येणार का? असा थेट प्रश्न भरत चव्हाण यांना स्वत: शरद पवार यांनी विचारला. डॉ. भरत चव्हाण यांच्यासाठी ही आश्चर्यजनक बाब होती. त्यांनीही शरद पवार यांना होकार देत सोबत येण्याची तयारी दर्शवली.
मुंबई : एखाद्या कार्यकर्त्यासाठी आपला नेता (Leader) हा देवापेक्षा कमी नसतो. नेत्यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते आपल्या जीवाचे रान करतात. नेत्यासोबत फोटो काढण्यासाठी कार्यकर्त्यांची नेहमीच मरमर असते. त्यामध्ये जर तुमचा आवडता नेता हा मंत्री (Minister) वगैरे असल्यास तर एक फोटो त्यांच्यासोबत मिळवण्यासाठी कितीतरी तास तुम्हाला वाट पाहत बसावी लागते. मात्र, चक्क एक कार्यकर्ता आपल्या नेत्याला भेटण्यासाठी गेला आणि त्याला आपल्या आवडत्या नेत्यासोबत विमान प्रवास (Travel) करण्याची सुवर्णसंधीच मिळाली.
डॉ. भरत चव्हाण यांनी केला शरद पवार यांच्यासोबत विमान प्रवास
औरंगाबाद येथील डॉ. भरत चव्हाण यांना चक्क ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी औरंगाबादपर्यंत विमान प्रवास सोबत करण्याची संधी दिली. विशेष म्हणजे डॉ. चव्हाण यांच्या ध्यानीमनी नसतानाही शरद पवार यांनी स्वत:च त्यांना विमान प्रवासाची ऑफर दिली. त्याचे झाले असे की, औरंगाबाद येथील डॉ. भरत चव्हाण हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटण्यासाठी बारामतीत आले होते. त्यांनी आपली ओळख आणि कामासंदर्भात शरद पवार यांना माहिती दिली. विविध विषयांवर चर्चा देखील केली.
कार्यकर्त्यांबद्दल आत्मियता बाळगणारा नेता
शरद पवार यांनीही त्यांच्याशी संवाद साधला. त्याचवेळी मीही आता औरंगाबादला निघालोय. माझ्यासोबत येणार का? असा थेट प्रश्न भरत चव्हाण यांना स्वत: शरद पवार यांनी विचारला. डॉ. भरत चव्हाण यांच्यासाठी ही आश्चर्यजनक बाब होती. त्यांनीही शरद पवार यांना होकार देत सोबत येण्याची तयारी दर्शवली. शरद पवार यांनी डॉ. चव्हाण यांना आपल्यासोबत विमानाने औरंगाबादपर्यंत नेलं. डॉ. चव्हाण यांच्यासाठी ही संधी सुखावणारी तर होतीच मात्र शरद पवार यांच्यातील कार्यकर्त्यांबद्दल आत्मियता बाळगणारं व्यक्तीमत्वही त्यांनी या निमित्तानं अनुभवलं.