Video | दारूच्या नशेत डॉक्टरचा रुग्णालयात गोंधळ, रुग्णाला शिविगाळ; बाजारसांवगीच्या आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार

औरंगाबादच्या बाजार सावंगीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टरने दारूच्या नशेत गोंधळ घालत रुग्णाला शिविगाळ केली. घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Video | दारूच्या नशेत डॉक्टरचा रुग्णालयात गोंधळ, रुग्णाला शिविगाळ; बाजारसांवगीच्या आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार
डॉक्टरचा दारूच्या नशेत गोंधळ
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 10:52 AM

औरंगाबाद : जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क डॉक्टरनेच (Doctor) दारू पिऊन रुग्णालयात (Hospital) गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या बाजारसांवगी येथील आरोग्य केंद्रामधील ही घटना आहे. नशेमध्ये बेफाम झालेल्या डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या रुग्णावर उपचार करण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर त्याने उपचारासाठी आलेल्या संबंधित रुग्णाला शिविगाळ देखील केली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून त्याच्या सहकारी डॉक्टरांनी संबंधित डॉक्टरला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी देखील या डॉक्टरची शिविगाळ सूरूच होती. अखेर त्याच्या इतर सहकारी डॉक्टरांनी त्याला रुग्णालयाच्या बाहेर नेले.  हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, याचा व्हिडीओ (Video) चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दारूच्या नशेत उपचारासाठी आलेल्या रुग्णाला शिविगाळ करणाऱ्या या डॉक्टरवर आता काय कारवाई होणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 नेमकं प्रकरण काय?

घटनेबाबत अधिक माहिती अशी की औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारसांवगीच्या आरोग्य केंद्रामधील हा सर्व प्रकार आहे. डॉक्टर दारूच्या नशेत होता. याचवेळी तिथे उपचारासाठी एक रुग्ण आला. डॉक्टरांनी या रुग्णाला शिविगाळ केल्याची घटना घडली आहे. डॉक्टरच्या इतर साथीदारांना हा प्रकार कळाल्यानंतर त्यांनी या डॉक्टरला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी देखील हा डॉक्टर ऐकत नसल्याने अखेर संबंधित डॉक्टरला उचलून बाहेर नेण्यात आले. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

व्हिडीओ व्हायरल

या प्रकरणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये डॉक्टर रुग्णाला शिविगाळ करत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित डॉक्टर हा दारूच्या नशेत होता. दारूच्या नशेत या डॉक्टरने  रुग्णालयात गोंधळ घातल्याचे दिसून येत आहे. या प्रकारानंतर तेथील इतर डॉक्टरांनी या डॉक्टरला रुग्णालयाच्या बाहेर नेल्याचे पहायला मिळत आहे. या व्हिडीओने जिल्ह्यात गोंधळ उडाला असून, या डॉक्टरवर आता काय कारवाई होणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.