25 सेकंदांचा थरार, 18 वर्षांचा तरुण चेंबरमध्ये पडला, पुढे काय घडलं ?

आज झालेल्या मुसळधार पावसात तुडुंब भरलेल्या चेंबरमध्ये एक तरुण पडल्याची घटना घडली. (aurangabad boy fallen in drainage chamber)

25 सेकंदांचा थरार, 18 वर्षांचा तरुण चेंबरमध्ये पडला, पुढे काय घडलं ?
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 11:13 PM

औरंगाबाद : राज्यात सध्या अनेक ठिकाणी पाऊस कोसळतो आहे. औरंगाबादेतही (Aurangabad) मागील आठ दिवसांपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. मात्र, आज झालेल्या मुसळधार पावसात (heavy rain) तुडुंब भरलेल्या चेंबरमध्ये एक तरुण पडल्याची घटना घडली. नशीब बलवत्तर म्हणून हा तरुण चेंबरमध्ये वाहत जाऊन दुसऱ्या चेंबरमधून सुखरुप बाहेर निघाला. शहरातील जय भवानी नगरतील ही घटना असून चेंबरमध्ये पडलेल्या तरुणाचे नाव मोरेश सुळ असे आहे. (Eighteen year boy fallen in drainage chamber in Aurangabad amid heavy rain)

नेमकं काय घडलं ?

सध्या मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. औरंगाबादेतही मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून विजांच्या कडकडाटासह पाऊस होतोय. आज औरंगाबाद शहरात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. याच वेळी एक भीषण घटना घडली. औरंगाबाद शहरीतल जय भवानीगर येथे एक 18 वर्षीय मोरेश सुळ नावाचा तरुण वाहत्या पाण्यातून चालत होता. यावेळी समोरचे न दिसल्यामुळे तो थेट चेंबरमध्ये पडला. बघता बघता अवघ्या 25 सेकंदात तो तब्बल 20 फूट वाहवत गेला. मात्र चेंबरमध्ये वाहत जाताना तो दुसऱ्या चेंबरपर्यंत पोहोचला. त्यानंतर नशीब बलवत्तर म्हणून तो योग्य वेळ ओळखून दुसऱ्या चेंबरमधून बाहेर येण्यात यशस्वी ठरला.

25 सेंकदांचा थरार

फक्त 25 सेकंदाचा हा थरारक प्रकार घडल्यामुळे येथे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण तरुण सुखरुप वाचल्यामुळे सर्वांनी सुटकेचे निश्वास सोडला.

मागील आठ दिवसांपासून रोज पाऊस

दरम्यान औरंगाबाद शहरात मागील आठ दिवसांपासून रोज पाऊस बरसतोय. आजही शहरात धुंवाधार पाऊस झाला. तब्बल अर्धा तास पासवाने येथे जोरदार बॅटिंग केली. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात इतरही ठिकाणी पाऊस पडला.

इतर बातम्या :

अनलॉकच्या पहिल्याच दिवशी नागरिकांची गर्दी, औरंगाबादेत बाजारपेठांच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी

औरंगाबादमध्ये हत्यांचं सत्र, 15 दिवसांत धारदार शस्त्रांनी 6 हत्या, गुन्हेगारांचा पोलिसांना आव्हान देण्याचा प्रयत्न!

विनवणी करुनही पेट्रोल नाकारलं, तब्बल तासभर मृतदेह रुग्णवाहिकेत पडून, औरंगाबादेतील संतपाजनक प्रकार

(Eighteen year boy fallen in drainage chamber in Aurangabad amid heavy rain)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.