“निलेश राणे वाचाळ प्राणी”; ठाकरे गटाच्या नेत्यांनी टिल्लू म्हणत नारायण राणेंचा राजकीय प्रवासच सांगितला

चंद्रकांत खैरे यांनी निलेश राणे यांच्यावर टीका करताना त्यांनी नारायण राणे ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मोठे झाले.

निलेश राणे वाचाळ प्राणी; ठाकरे गटाच्या नेत्यांनी टिल्लू म्हणत नारायण राणेंचा राजकीय प्रवासच सांगितला
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 11:53 PM

औरंगाबादः गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांमुळे ठाकरे-राणे वाद दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यानंतर निलेश राणे यांच्यावर ठाकरे गटातील नेत्यांनी सडकून टीका केली आहे. आमदार राजन विचारे, खासदार विनायक राऊत आणि आता चंद्रकांत खैरे यांनी निलेश राणे हा वाचाळ प्राणी असून तो टिल्लू असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस ठाकरे-राणे वाद वाढत असल्याचे दिसून येत आहे.

चंद्रकांत खैरे यांनी राणे यांच्या पितापुत्रांवर टीका करताना त्यांनी नारायण राणे यांचा राजकीय प्रवासच सांगितला. नारायण राणे यांना कोण ओळखत होते.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळी पदं देऊन त्यांना नगरसेवकापासून ते अगदी मुख्यमंत्री पदापर्यंत ठाकरे कुटुंबीयांनी पोहचवले आहे.

तरीही राणे यांच्या कुटुंबीयांकडून ठाकरे घराण्यावर शिवराळ भाषेत टीका केली जात असेल तर ती चुकीची आहे असं मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले.

चंद्रकांत खैरे यांनी निलेश राणे यांच्यावर टीका करताना त्यांनी नारायण राणे ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मोठे झाले.

त्यांच्यावरच आता ही माणसं टीका करत आहेत. त्यामुळे हे चुकीचे असल्याचे सांगत निलेश आणि नितेश राणे लहान लहान असताना त्यांनी आपल्या राजकीय प्रवास घडवला असल्याचेही खैरे यांनी स्पष्ट केले.

निलेश राणे यांच्यावर सध्या विनायक राऊत, राजन विचारे, वैभव नाईक यांच्याकडून जोरदारपणे राणे कुटुंबीयांवर हल्लाबोल केला जात आहे.

चंद्रकांत खैरे यांनीही निलेश राणे यांच्यावर टीका करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टिल्ल्या लोकांवर आपण बोलत नसल्याचे सांगत त्यांनी त्यांची खिल्ली उडवली होती. त्याच प्रकारे चंद्रकांत खैरे यांनी टिल्लू म्हणत निलेश राणे यांची खिल्ली उडवली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.