GudhiPadwa | गुढी उत्साहाची, निर्बंधमुक्तीची… राज्यात सोने खरेदीचा उत्साह, वाचा Gold Price Today!

औरंगबाद | तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाचं सावट मागे हटलंय, राज्यात निर्बंध मुक्तीचा उत्साह संचारलाय आणि गुढी पाडव्याचा अत्यंत महत्त्वाचा मुहूर्तही आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढी पाडव्याला (GudhiPadwa) सोने खरेदी (Gold Buying) करण्याची भारतीय परंपरा आहे. नकारात्मकतेच्या लाटा विरल्या असून सकारात्मकतेचं वातावरण तयार झाल्याचे दृश्य बाजारपेठेत (Boom in Market) आहे. त्यामुळेच तर हिंदू नव वर्षाच्या […]

GudhiPadwa | गुढी उत्साहाची, निर्बंधमुक्तीची... राज्यात सोने खरेदीचा उत्साह, वाचा Gold Price Today!
Gold
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 5:12 PM

औरंगबाद | तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाचं सावट मागे हटलंय, राज्यात निर्बंध मुक्तीचा उत्साह संचारलाय आणि गुढी पाडव्याचा अत्यंत महत्त्वाचा मुहूर्तही आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढी पाडव्याला (GudhiPadwa) सोने खरेदी (Gold Buying) करण्याची भारतीय परंपरा आहे. नकारात्मकतेच्या लाटा विरल्या असून सकारात्मकतेचं वातावरण तयार झाल्याचे दृश्य बाजारपेठेत (Boom in Market) आहे. त्यामुळेच तर हिंदू नव वर्षाच्या पहिल्या दिवशी, उत्तम मुहूर्तावर वाहन आणि गृहनिर्माण क्षेत्रात ज्याप्रमाणे उत्साह आहे, तसाच सोने खरेदीदारांचा उत्साह दिसून येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. गुढीपाडव्यासाठी राज्यातील सराफा पेढ्या सज्ज झाल्या आहेत. एका अंदाजानुसार, गुढीपाडव्याला किमान 3000 किलो सोन्याचे दागिने ग्राहकांकडून खरेदी केले जातील, असे सराफा व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.

गुढी पाडव्याचाच मुहूर्त का?

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर कोणताही धातू खरेदी केल्यास तो चिरंतन राहून त्यात वृद्धी होते. या मुहूर्तावर खरेदी केल्याने त्यात वृद्धी होऊन संपन्नता येते, असे मानले जाते. त्यामुळेच या दिवशी सोने खरेदी किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करावी, अशी हिंदूंची श्रद्धा आहे. गुढीपाडव्याप्रमाणेच अक्षय्य तृतीय, विजयादशमी अर्थात दसरा आणि दिवाळी पाडव्याचा अर्धा मुहूर्त असे साडेतीन मुहूर्त सोने खरेदीसाठी शुभे मानले जातात.

सोन्याचे आजचे भाव काय?

आंतराराष्ट्रीय पातळीवरील युद्धस्थितीमुळे सोन्या-चांदीच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला 8 मार्चपर्यंत सोन्याचे भाव काहीसे वाढले होते. 55,155 रुपये प्रति तोळा असे 24 कॅरेट सोन्याचे दर त्यावेळी होते. त्यानंतर सातत्याने सोन्याच्या दरात घसरण होत गेली. 22 ते 28 मार्च पर्यंत पुन्हा दरात वाढ झाली आणि 29 मार्चला सोन्याने 52,215 रुपये प्रति तोळा एवढी निचांकी पातळी गाठली होती. त्यानंतर सोन्याचे भाव वाढत असून आज 01 एप्रिल रोजी सोन्याचे भाव 53,285 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले.

प्रमुख शहरांतील आजचे भाव काय?

ही प्रमुख शहरांतील आजचे 24 कॅरेट सोन्याचे भाव पुढीलप्रमाणे- नवी दिल्ली- 52,470 रुपये प्रति तोळा हैदराबाद- 52, 470 रुपये प्रति तोळा मुंबई- 52,470 रुपये प्रति तोळा पुणे- 52550 रुपये प्रति तोळा नागपूर- 52550 रुपये प्रति तोळा औरंगबाद- 52560 रुपये प्रति तोळा नाशिक- 52550 रुपये प्रति तोळा

चांदीच्या भावातही वाढ

दरम्यान, चांदीच्या भावातही काहीशी वाढ झालेली दिसून येत आहे. काल एक किलो शुद्ध चांदीचे दर 66,800 रुपये एवढे होते. तर आज 01 एप्रिल रोजी चांदीचा भाव 67,600 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचे दर पुढीलप्रमाणे- नवी दिल्ली- 67600 रुपये प्रति किलो हैदराबाद- 71,700 रुपये प्रति किलो मुंबई- 67600 रुपये प्रति किलो पुणे- 67600 रुपये प्रति किलो नागपूर- 67600 रुपये प्रति किलो औरंगबाद- 67700 रुपये प्रति किलो नाशिक- 67600 रुपये प्रति किलो

इतर बातम्या-

वर्धा येथील Oxygen Park ला आग, दोन हजार झाडं जळाली; विद्यार्थ्यांचा आग विझविण्याचा प्रयत्न

मविआत कोणतंही नाराजीनाट्य नाही, BJP च्या नेत्यांनी उगाच त्रास करुन घेऊ नये – Sanjay Raut

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.