HSC Exams| राज्यात उद्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा, मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत 408 केंद्र सज्ज!

बारावीची ही परीक्षा 07 एप्रिलपर्यंत चालणार आहे. तर दहावीची परीक्षआ 15 मार्च ते 04 एप्रिल पर्यंत चालणार आहे. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहून परीक्षा द्यावी, असे आवाहन विभागीय मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांनी केले आहे.

HSC Exams| राज्यात उद्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा, मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत 408 केंद्र सज्ज!
प्रातिनिधीक फोटो Image Credit source: File Photo
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 3:00 AM

औरंगाबादः महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या  वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला (HSC Exams) उद्या म्हणजेच शुक्रवार दिनांक 4 मार्चपासून प्रारंभ होत आहे. परीक्षासाठी बोर्डाकडून (HSC Board) जय्यत तयारी करण्यात आली आहे. परीक्षेच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विविध भरारी पथकांचीही स्थापना करण्यात आली आहे. मराठवाडा विभागातील (Marathwada) पाच जिल्ह्यांमधून सुमारे 1, 69, 289 विद्यार्थी बारावीची परीक्षा देतील.

मराठवाड्यात किती केंद्रांवर सज्जता?

औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील 408 केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. विभागात 1 लाख 69 हजार 289 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोर्डाने तयारीदेखील सुरु केली आहे. तर विद्यार्थ्यांनीही ऑनलाइनचा विषय टाळून ऑफलाइन परीक्षेसाठी तयारी केली आहे. बारावीची ही परीक्षा 07 एप्रिलपर्यंत चालणार आहे. तर दहावीची परीक्षआ 15 मार्च ते 04 एप्रिल पर्यंत चालणार आहे. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहून परीक्षा द्यावी, असे आवाहन विभागीय मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांनी केले आहे.

कोणत्या जिल्ह्यातून किती विद्यार्थी?

बारावीच्या परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यांतील विद्यार्थी आणि केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे- औरंगाबाद- 58, 374 विद्यार्थी, 153 केंद्र बीड- 38,143 विद्यार्थी, 99 केंद्र जालना-31376 विद्यार्थी, 69 केंद्र परभणी-24,471 विद्यार्थी, 55 केंद्र हिंगोली- 13,472 विद्यार्थी, 32 केंद्र

दहावीच्या परीक्षेसाठी किती विद्यार्थी, किती केंद्र?

औरंगाबाद- 64,622 विद्यार्थी, 224 केंद्र बीड- 41, 676 विद्यार्थी, 156 केंद्र जालना-30, 483 विद्यार्थी, 100 केंद्र परभणी-28, 695 विद्यार्थी, 93 केंद्र हिंगोली- 16126 विद्यार्थी, 53 केंद्र

इतर बातम्या-

ICC T20 Rankings: श्रेयस अय्यरची मोठी झेप, विराट, रोहित टॉप-10 मधून बाहेर

Weight Loss Tips : तुम्हाला वजन कमी करायचे आहे तर तुमच्या आहारात या फळांचा समावेश करा, आणि फायदे पाहा…

बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.