AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2024 पर्यंत जिवंत राहिलो तर भाजपला मतदान करणार नाही; मनसेच्या बड्या नेत्याची भीष्मप्रतिज्ञा

प्रकाश आंबेडकर हे त्यांचे चार खासदार निवडून आले त्यावेळी ते काँग्रेस सोबत होतेच. वंचितमध्ये जी ताकत आहे त्याचा उपयोग काँग्रेस करून घेऊन शकते, असं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी सांगितलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.

2024 पर्यंत जिवंत राहिलो तर भाजपला मतदान करणार नाही; मनसेच्या बड्या नेत्याची भीष्मप्रतिज्ञा
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 2:42 PM

औरंगाबाद : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फूट पडली आहे. या फुटीमागे भाजपचा हात असल्याचं सांगितलं जात असून भाजपवर टीकाही होत आहे. राजकारणातील ही खिचडी पाहून मनसे नेते वसंत मोरे यांनी व्यथित होऊन एक पोस्ट केली होती. त्यानंतर आता मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनीही व्यथित होऊन एक पणच केला आहे.

प्रकाश महाजन यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. दोन दिवस हे घडलं त्या सत्तेसाठी केलेल्या अनैतिक तडजोडी आहेत. दोन दिवसांपूर्वी इंदौरच्या सभेत एक टोपी फेकली ती टोपी ज्यांची डोक्यावर फिट बसली ते भाजपच्या दारात आले आहेत

हे सुद्धा वाचा

हीच तत्त्वाची भूमिका आहे काय?

भाजपची हीच तत्त्वाची भूमिका आहे का.? एक मतांमुळे अटलजीचे सरकार गेले पण अटलजींनी तत्त्वासाठी किंवा पक्ष फोडून सत्ता मिळवायची नाही अशी भूमिका भाजपची होती, ती भाजप आणि आजची भाजप कुठे आहे. 2024 ला अपेक्षित यश मिळणार नाही म्हणून अनैतिक आघाड्या सुरू आहेत. आज भाजपचा नैतिकतेचा बुरखा टराटरा फाटला आहे. जुने भाजपचे हार्डकोअर कार्यकर्ते, संघाचे कार्यकर्त्यांना हे पटलेलं नाही. भाजप आज त्याच रांगेत बसला ज्या रांगेत इतर पक्ष आहेत, असा हल्लाच महाजन यांना चढवला.

मतदान करणार नाही

ना खाऊँगा, ना खाने दुँगा म्हणणाऱ्यांच्या पक्षात खाऊन आलेलेच लोक आले आहेत. छगन भुजबळ दोन वर्षे जेलमध्ये सत्याग्रह करून गेले का होते? अमोल मिटकरी ब्राम्हण समाजाबद्दल अत्यंत वाईट बोलले. त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे? हे लोक उद्या संघाच्या पथसंचालनात सहभागी होणार आहेत का? ज्या लोकांनी आणीबाणीत आम्हाला काठ्या मारल्या, जेलमध्ये टाकलं ते लोक आज भाजपचे नेते आहेत, असं सांगतानाच 2024 पर्यंत जिवंत राहिलो तर भाजपला मतदान करणार नाही, अशी प्रतिज्ञाच त्यांनी केली आहे.

तेच लोक मोठ्या पदावर

भाजपचे स्ट्रक्चर सत्तेच्या लालसेपोटी भाजपच्या प्रमुखांनी उद्ध्वस्त केलं आहे. कालपर्यंत ज्यांनी भाजपला शिव्या दिल्या, टर उडवली ते आज भाजपसोबत मोठ्या पदावर आहेत, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

जे पेरलं तेच उगवलं

शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर जाण्यापेक्षा गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीवर जायला हवं होतं. शरद पवार यांनी सर्वांचे पुतणे फोडले. पण राष्ट्रवादीने जे पेरलं तेच उगवलं, असा हल्लाही त्यांनी चढवला.

जनता उद्रेक करेल

महाराष्ट्राची जनता शांत आहे याचा अर्थ त्यांनी बदल मान्य केलाय असा होत नाही, जनता उद्रेक करेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच राज ठाकरे यांच्याकडे लोक मोठ्या आशेने पाहत आहेत. आम्ही त्यासाठी प्रयत्न करू, असंही त्यांनी सांगितलं.

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.