औरंगाबादः सातारा देवळाईतील नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही, आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य 

सातारा परिसरातील विकासाच्या कामांसाठी निधीवाटपात अन्याय होऊ देणार नाही. जनहितासाठी व विकास कामांसाठी आपला आग्रह कायम राहील, अशी ग्वाही आमदार संजय शिरसाट यांनी दिली.

औरंगाबादः सातारा देवळाईतील नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही, आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य 
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 5:50 PM

औरंगाबादः सातारा परिसरातील विकासाच्या कामांसाठी निधीवाटपात अन्याय होऊ देणार नाही. जनहितासाठी व विकास कामांसाठी आपला आग्रह कायम राहील, अशी ग्वाही आमदार संजय शिरसाट यांनी दिली. रविवारी सातारा परिसरातील द्वारकादास नगर, अथर्व क्लासिक येथील सिमेंट रस्त्याचे उद्घाटन व अबरार कॉलनी येथील भूमिगत गटारीचे भूमिपूजन आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

पश्चिम विधानसभा मतदार संघावर पालिकेचा अन्यायः शिरसाट

या कार्यक्रमात बोलताना आमदार शिरसाट म्हणाले, माझा पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा मोठ्या प्रमाणात व्यापला आहे. त्यामुळे या भागाचा विकास केवळ आमदार निधीतून होत नाही तर वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करून सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी आणावा लागतो. आपली महापालिका आतापर्यंत सातारा-देवळाईचा विकास करू शकली नाही. मागच्या वेळी राज्य शासनाने मनपाला 80 कोटी रुपयांचा निधी दिला. मात्र पश्चिम मतदारसंघाच्या विकासकामासाठी त्यापैकी फक्त अडीच कोटींचा निधी मनपाने दिला. असा अन्याय का? याचा जाब मी विचारला. सातारा देवळाईच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बैठक घेऊन 350 कोटी मंजूर केले. तो सर्वच निधी याच भागासाठी वापरायला हवा. या भागातील जास्तीत जास्त रस्ते या निधीतून व्हावेत, यासाठी माझा पाठपुरावा असेल, असे आश्वासन शिरसाट यांनी दिले.

प्रसंगी अतिरिक्त निधी आणेन

अबरार कॉलनी येथील भूमिगत गटार योजनेचे उद्घाटन करताना आमदार संजय शिरसाट म्हणाले, या भागातील नागरिकांच्या सुविधांसाठी प्रसंगी अतिरिक्त निधी आणावा लागला तर तोदेखील सरकारकडून आणण्याची माझी तयारी आहे. इथले लोक महापालिकेचे सगळे कर भरतात. मग सोयी-सुविधांबाबत त्यांना सापत्न वागणूक का, असा सवालही शिरसाट यांनी याप्रसंगी उपस्थित केला. या उद्घाटनाच्या कार्यक्रमप्रसंगी उपशहरप्रमुख रमेश बाहुले, माजी महापौर रशीदमामू, मुसा चाऊस, विभागप्रमुख रंजित ठेपे, उपलिभागप्रमुख मनोज सोनवणे, वाळू मिसाळ, संतोष जाटवे, शाखाप्रमुख ईश्वर पारखे, शेख मुनीर, महेश कदम आदी उपस्थित होते.

इतर बातम्या-

औरंगाबादः हिंदूंच्या घरावर बुलडोझर फिरवल्यास शिवसेनेला गंभीर परिणाम भोगावे लागतील, प्रवीण दरेकरांचा इशारा

Crime: बचत गटवाल्या चौकडीने औरंगाबादेतल्या वकील महिलेलाही फसवलं, 18 लाखांचा गंडा घातल्याचं उघड

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.