‘मुख्यमंत्री टीव्हीवर येऊन फक्त ‘ज्ञान’ देतात, आता काहीही कारवाई करा, पण 1 जूनपासून दुकानं उघडणारच’
राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवला तरी आम्ही तो झुगारुन दुकानं सुरु करु. मग सरकारला जे काही करायचय ते करु द्या | Maharashtra Lockdown Shops
औरंगाबाद: ठाकरे सरकारने आता कोणतीही कारवाई केली तर आम्ही 1 जुनपासून औरंगाबादमधील दुकानं उघडणारचं, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel) यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) टीव्हीवर येऊन फक्त ज्ञान देतात. त्यांना राज्याच्यादृष्टीने काय चांगला निर्णय घ्यायचाय तो घेऊ दे. पण औरंगाबादसाठी आम्ही हा निर्णय मान्य करणार नाही. आम्ही 1 जुनपासून दुकानं उघडणारच, असे इम्तियाज जलील यांनी ठणकावून सांगितले. (We will start shops from 1 june if Thackeray govt extend Maharashtra Lockdown)
ते मंगळवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, दुकानदारांचे हप्ते आणि त्यावरील व्याज माफ करण्यासाठी बँका तयार आहेत, असे सरकारने जाहीर करावे. अन्यथा राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवला तरी आम्ही तो झुगारुन दुकानं सुरु करु. मग सरकारला जे काही करायचय ते करु द्या, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले.
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे सरकार 1 जूनपासून लॉकडाऊन उठवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करेल. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दुकाने उघडली जातील. गेल्या काही दिवसांत दुकाने बंद असल्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी पहिल्या टप्प्यात हे सर्व व्यवहार सुरु करण्यावर सरकार भर देईल.
‘आम्ही सर्व नियम पाळतो, पण 1 जूनपासून दुकाने उघडू द्या’
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व नियम आणि निर्बंधांचे पालन करायला आम्ही तयार आहोत. पण राज्य सरकारने 1 जूनपासून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी कळकळीची विनंती राज्यातील व्यापारी समाजाने ठाकरे सरकारला केली आहे. पुणे आणि मुंबईतील व्यापाऱ्यांनीही ठाकरे सरकारकडे 1 जुनपासून दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. 31 मे रोजी दुकाने बंद राहिल्याचा कालावधी 55 दिवसांचा होईल. त्यामुळे तब्बल 50 लाख लोकांचा रोजगार धोक्यात आहे. परिणामी राज्य सरकारने 1 जुनपासून दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, असे एफआरटीडब्ल्युचे अध्यक्ष विरेन शाह यांनी म्हटले होते.
संबंधित बातम्या:
Maharashtra Lockdown: राज्यात 4 टप्प्यात अनलॉकिंग; काय आहे ठाकरे सरकारचा प्लॅन?
आम्ही सर्व नियम पाळतो, पण 1 जूनपासून दुकाने उघडू द्या; व्यापाऱ्यांची ठाकरे सरकारला कळकळीची विनंती
…तर आमच्याकडे तिसरी लाट येणारच नाही; ‘या’ राज्यातील कोरोना नियंत्रणात, अनलॉकिंगची तयारी
(We will start shops from 1 june if Thackeray govt extend Maharashtra Lockdown)