Aurangabad: शेकटा परिसरात तब्बल सव्वा कोटींचा गुटखा जप्त, ट्रकचा पाठलाग करून कारवाई, दोघांना अटक

औरंगाबादमध्ये रविवारी शहर पोलिसांनी करमाड पोलिसांच्या सहकार्याने तब्बल सव्वा कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करत ही कारवाई केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.

Aurangabad: शेकटा परिसरात तब्बल सव्वा कोटींचा गुटखा जप्त, ट्रकचा पाठलाग करून कारवाई, दोघांना अटक
सव्वा कोटींचा गुटखा जप्त केल्यानंतर औरंगाबादेत दोघांना अटक
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 11:25 AM

औरंगाबादः जालना महामार्गावरील शेकटा परिसरात गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी मोठा सापळा रचून पकडला. सदर गुटख्याच्या ट्रकची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी करमाड पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई पार पाडली. ट्रकमधून एक कोटी रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. करमाड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटख्याच्या पुड्या आढळून आल्यावर औरंगाबादेत एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

अमरावतीहून मुंबईकडे जात होता ट्रक

रविवारी एक कोटीपेक्षा जास्त रकमेचा गुटखा घेऊन जाणारा एक ट्रक अमरावतीहून मुंबईकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी करमाड पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी बरेच अंतर पाठलाग करत या ट्रकला शेकटा शिवारातील गोलटगाव फाट्याजवळ आयशर ट्रक आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला.

रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कारवाई

गुटखा घेऊन जाणाऱ्या या ट्रकमध्ये एक कोटी पंचवीस हजारांचा गुटखा आढळला. पोलिसांनी वाहनासह चालक आणि आणखी एकाला  ताब्यात घेतले. त्याच्यावर करमाड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निमित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर, आदींनी पार पाडली.

इतर बातम्या-

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करा!

31 डिसेंबपर्यंत दाखल करता येणार ‘आयटीआर’; आयकर विभागाकडून जनजागृती

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.