AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिकेतील किती कोटी रुपये कंत्राटदार, अधिकाऱ्यांच्या खिशात, इम्तियाज जलील यांनी स्पष्टचं सांगितलं

एक हजार कोटी रुपये कुणाकुणाला मिळतात, याचा तपशील आम्हाला सांगावा, अशी विचारणा इम्तियाज जलील यांनी केली.

महापालिकेतील किती कोटी रुपये कंत्राटदार, अधिकाऱ्यांच्या खिशात, इम्तियाज जलील यांनी स्पष्टचं सांगितलं
इम्तियाज जलील
| Edited By: | Updated on: Jan 06, 2023 | 4:55 PM
Share

औरंगाबाद : कंत्राटी कामगारांची औरंगाबाद महापालिकेत पिळवणूक होते. त्याला विरोध करण्यासाठी कंत्राटी कामगारांनी विभागायी आयुक्त कार्यालयासमोर आंदोलनं केलं. या आंदोलनात खासदार इम्पिजाय जलील सहभागी झाले होते. इम्पियाज जलील म्हणाले, कामगारांवर अन्याय होत आहे. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचं संगनमत झालंय. कोणाला कामावर घ्यायचं. कोणाला कंत्राट द्यायचं याचं सगळं संगनमत झालं आहे. कंत्राटी कामगारांचे इएसआयसी जमा केली जात नाही.

औरंगाबाद महापालिकेत पंधराशे कामगार आहेत. त्यांचं शोषण होत आहे. याच्या विरोधात विभागीय आयुक्तांकडं आलेलो आहोत. अन्याय होत असताना आपण गप्प का बसलात याची विचारणा करणार असल्याचं इम्तियाज जलील म्हणाले.

कंत्राटी कामगारांवर अन्याय होत असनात अधिकारी गप्प का बसलेत, याची विचारणा करण्यासाठी आलो असल्याचंही इम्तिजाय जलील यांनी सांगितलं. कंत्राटदार हे राजकीय पक्षांचे नातेवाईक आहेत. कोट्यवधी रुपयांचा खर्च या कंत्राटदारांवर होतो. कामगारांचा पगार साडेतीन हजार कोटी रुपये निघतो.

अडीच हजार कोटी रुपये हे कामगारांना वाटण्यात जातात. इतर एक हजार कोटी रुपये कुणाकुणाला मिळतो, याचा तपशील आम्हाला सांगावा, अशी विचारना इम्तियाज जलील यांनी केली.

ईएसआयसी, पीएफ, मिनिमम वेजेस अॅक्टनुसार वेजेस दिले गेले पाहिजे. अन्यथा मोठं आंदोलन उभं करणार असल्याचा इशाराही इम्तियाज जलील यांनी दिला. कंत्राटी कामगारांची पिळवणूक कमी व्हावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आलं.

औरंगाबादमध्ये कंत्राटी कामगारांनी आंदोलन केलं. या आंदोलनाचे नेतृत्व इम्तियाज जलील यांनी केलं. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. कामगार आणि पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.