अरेरे, गडबडच झाली हो… चोरी केलेल्या घरात चोर स्वतःचा मोबाइलच विसरला, औरंगाबाद पोलिसांकडून संशयित ताब्यात

आठवडाभरातच 17 ठिकाणी घरफोड्या झाल्या. तर एन-3 मधील वानखेडे नगरात एकाच रात्री 5 घरे फोडण्यात आली. यामुळे पोलिसांनी शहराची सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याची चर्चा शहरात सुरु आहे. त्यासोबतच चोराने स्वतःचा मोबाइल चोरी केलेल्या घरातच विसरल्यामुळे चोराच्या या मूर्खपणाचीही चर्चा शहरात सुरु आहे.

अरेरे, गडबडच झाली हो... चोरी केलेल्या घरात चोर स्वतःचा मोबाइलच विसरला, औरंगाबाद पोलिसांकडून संशयित ताब्यात
औरंगाबादेत चोराने घरफोडी करून स्वतःचा मोबाइल तिथेच ठेवला
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 10:41 AM

औरंगाबादः चोरी करणारे लोक खूप हुशार असतात, चोरी (Aurangabad police ) केलेल्या घरात कोणतीही महागडी वस्तू शिल्लक ठेवत नाहीत आणि हो… आपली ओळख पटेल, असा कोणताही पुरावा मागे ठेवत नाहीत, असं ऐकलेलं आहे. मात्र औरंगाबादमध्ये (City Crime) काल झालेल्या चोरीत चोराने भलतीच चूक केली. ज्या घराचं कुलूप तोडून चोरानं येथील लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारला, तिथं स्वतःचा मोबाइलच विसरला. चोराच्या या मूर्खपणाची (Aurangabad Thief) चर्चा सध्या शहरात सुरु आहे.

घरात दिसला अनोळखी मोबाइल

शहरातील बेगमपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री पाच ते सहा घरे चोरांनी फोडली. यातील एका घराचे कुलूप तोडून चोराने त्याचा मोबाइल घरात ठेवला आणि चोरी करून जाताना चुकून दुसराच मोबाइल सोबत नेला. घरफोडीची घटना कळताच बेगमपुरा पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या वेळी एक मोबाइल नव्याने घरात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यावरून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले.

चर्चा पोलिसांच्या अपयशाची अन् चोरांच्या मूर्खपणाची

औरंगाबाद शहरात दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेलेल्या नागरिकांची विविध कॉलनीतील घरे चोरट्यांनी फोडली. दिवाळीनिमित्त पोलिसांनी ‘आपला शेजारी, खरा पहारेकरी’ हे अभियान राबवले. तसेच रात्रीच्या वेळी पोलिसांच्या गस्तीत वाढ करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र शहरात पोलिसांची ही विशेष मोहीम सपशेल फेल गेल्याचे चित्र दिसून आले. शहरात मागील आठवडाभरातच 17 ठिकाणी घरफोड्या झाल्या. तर एन-3 मधील वानखेडे नगरात एकाच रात्री 5 घरे फोडण्यात आली. यामुळे पोलिसांनी शहराची सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याची चर्चा शहरात सुरु आहे. त्यासोबतच चोराने स्वतःचा मोबाइल चोरी केलेल्या घरातच विसरल्यामुळे चोराच्या या मूर्खपणाचीही चर्चा शहरात सुरु आहे.

इतर बातम्या-

औरंगाबादेत 24 तासात डझनभर घरं फोडली, रात्र गस्तीवर आयुक्तांची नाराजी, ठाणेदार जबाबदार!

Aurangabad: लेबर कॉलनीवरची कारवाई तूर्त टळली, पालकमंत्र्यांना रहिवाश्यांची भावनिक साद, नोटीस रद्द करण्याची मागणी

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.