100 कोटींच्या उत्सवात कुठेय औरंगाबाद ? जिल्ह्यात 20 टक्केच नागरिकांचे दोन डोस, जागे व्हा, लस घ्या!

जिल्ह्यात 32 लाख 24 हजार 677 जणांना लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. यापैकी 23 लाख 48 हजार 189 जणांनी (52 टक्के) पहिला तर 6 लाख 70 हजार 390 लोकांनी (20 टक्के) दुसरा डोस घेतला.

100 कोटींच्या उत्सवात कुठेय औरंगाबाद ? जिल्ह्यात 20 टक्केच नागरिकांचे दोन डोस, जागे व्हा, लस घ्या!
जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे महापालिकेचे आवाहन
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 10:29 AM

औरंगबााद: शंभर कोटी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण(Corona Vaccination)  पूर्ण केल्याच्या आनंदात संपूर्ण देशभरात उत्सव साजरा केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मात्र लसीकरणात नागरिकांची साथ मिळत नसल्याचे चित्र आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील 23 लाख 48 हजार 189 डोसचा नगण्य वाटा आहे. जिल्ह्यात 32 लाख 24 हजार 677 जणांना लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. यापैकी 23 लाख 48 हजार 189 जणांनी (52 टक्के) पहिला तर 6 लाख 70 हजार 390 लोकांनी (20 टक्के) दुसरा डोस घेतला. विशेष म्हणजे 16 जानेवारीला सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत सर्वाधिक 5 लाख लसीकरण एकट्या सप्टेंबर महिन्यात झाले. ऑक्टोबर महिन्यात महापालिकेकडून (Aurangabad Municipal corporation) लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. नागरिकांना अगदी सहज शक्य होईल, एवढ्या मोक्याच्या ठिकाणी लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. तरीही नागरिक लसीकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत. कोरोनाचं संकट अद्याप संपलेलं नाही, हे लक्षात घेऊन नागरिकांनी लसीकरणाला प्रतिसाद देण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.

आता मिशन युवा स्वास्थ्य

मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेअंतर्गत मनपाकडून महाविद्यालयांमध्ये लसीकरण शिबिरे घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांचा डेटा मिळवण्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालयांना पत्र पाठवणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडेलचा यांनी सांगितले. 23 ऑक्टोबर रोजी देवगिरी, 25 ऑक्टोबरला एमपी लॉ कॉलेजात लसीकरण होईल. स.भु., वाय.बी. चव्हाण, विवेकानंद, सय्यद महाविद्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे.

गुरुवारी दुपटीने वाढली रुग्णसंख्या

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट दिसून येत होती. मात्र बुधवारच्या तुलनेत गुरुवारी जिल्ह्यात रुग्णसंख्या दुपटीने वाढली दिवसभरात 25 कोरोना रुग्णांची भर पडली असून यात मनपा हद्दीतील 14 आणि ग्रामीण भागातील 11 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील शांतीनिकेतन कॉलनीत 1, नॅशनल कॉलनीत 2, इतर ठिकाणी 11 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर उपचार सुरु असताना दोन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली असून सध्या 130 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 19 ऑक्टोबरला जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच आठच रुग्णांची वाढ झाली होती. मात्र त्यानंतर बुधवारी 11 रुग्णांची भर पडली. गुरुवारी तर दुपटीपेक्षा जास्त म्हणजेच 25 रुग्णांची वाढ झाल्याने शहरातील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

शहरातील नागरिकांनी प्रतिसाद द्यावा

औरंगाबाद शहरात 10 लाख 55 हजार 600 नागरिकांच्या लसीकरणाचे लक्ष्य आहे. त्यापैकी 9,02,117 जणांनी लस घेतली. 3,39,000 जणांनी दोन्ही डोस घेतले आहे. तर 5,81,357 जणांनी पहिला डोस घेतला आहे. महापालिका आता महाविद्यालयांमध्ये लसीकरण शिबिर भरवणार आहे. 18 वर्षांपुढील तरुणांनी कोरोना लस घ्यावी, याकरिता ही मोहीम राबवण्यात येणार आहे, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

इतर बातम्या-

औरंगाबाद शहरात लाईट हाऊस प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद, सहा महिन्यात 150 पेक्षा जास्त युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण

पुरुषांना बांधून ठेवले अन् चौघांची वासना जागृत झाली, तोंडोळी दरोड्याची आपबिती, औरंगाबाद पोलिसांसमोर नवे आव्हान!

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.