Corona Updates:  मराठवाड्यात कोरोनाचे उग्र रुप, औरंगाबादेत 24 तासात हजाराचा आकडा पार, इतर जिल्ह्यात काय स्थिती?

औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी 1097 कोरोना बाधितांची नव्याने भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 56 हजार 703 एवढी झआली आहे. मंगळवारी रुग्णालयातून 580 जणांना सुटी देण्यात आली.

Corona Updates:  मराठवाड्यात कोरोनाचे उग्र रुप, औरंगाबादेत 24 तासात हजाराचा आकडा पार, इतर जिल्ह्यात काय स्थिती?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 9:37 AM

औरंगाबादः मराठवाड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने (Corona third wave) उग्र रुप धारण केले आहे. मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा हजारांच्या पार गेला. तर आठही जिल्ह्यातील रुग्णांची संख्या अडीच हजारांवर पोहोचली. औरंगाबाद, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्येचा स्फोट पहायला मिळत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काल मंगळवारी एकाच दिवसात 1097 नवे रुग्ण सापडले तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. तर नांदेडमध्ये 758 आणि लातूरमध्ये 782 नव्या रुग्णांची नोंद झाली. या तिन्ही जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हिटी दरातही मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काय स्थिती?

औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी 1097 कोरोना बाधितांची नव्याने भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 56 हजार 703 एवढी झआली आहे. मंगळवारी रुग्णालयातून 580 जणांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3 हजार 665 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी शहराच्या हद्दीतील रुग्णांची संख्या 767 एवढी तर ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या 330 एवढी नोंदवली गेली.

इतर जिल्ह्यांची स्थिती काय?

मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये मंगळवारी आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे- जालना-282 परभणी- 235 नांदेड- 758 हिंगोली- 85 बीड- 205 लातूर- 782 उस्मानाबाद- 333 एकूण- 3777

कोरोना नियंत्रणात- आरोग्य मंत्री

मराठवाड्यातील रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला असला तरी राज्य तसेच देश पातळीवर काहीसे सकारात्मक चित्र असल्याची माहिती सरकारने दिली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून राज्यातील एकूण कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मागील काही दिवसांपासून राज्यात दररोज सरासरी 40 हजार कोरोना रुग्णांची नोंद होत होती. मात्र मंगळवारपासून रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसू लागली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.32 टक्के आहे. तर कोरोनाचा मृत्यूदर 1.95 टक्के असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

इतर बातम्या-

Nashik | तरुणास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सावकाराला नाशिकमध्ये बेड्या

Shattila Ekadashi 2022 Katha : षटतिल एकादशीचे व्रत तुम्ही ठेवणार असाल तर पूजेच्या वेळी ही कथा अवश्य वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.