Beed Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडचा पाय खोलात… 14 दिवसाची पोलीस कोठडी; कोर्टात काय काय घडलं?

बीडच्या मसाजोग गावातील सरपंच हत्या प्रकरणी सीआयडीने आरोपी वाल्मिक कराडला अटक केली आहे. कराड स्वतःहून पुण्यातील सीआयडी कार्यालयात आज हजर झाला. त्यानंतर त्याला आज रात्री उशिरा केज कोर्टात हजर करण्यात आले आणि रिमांडची मागणी मान्य झाली. विशेष म्हणजे रिमांडच्या सुनावणीआधी केज कोर्ट परिसरात मोठी गर्दी झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. अखेर कोर्टबाहेर 100 पेक्षा जास्त पोलिसांच्या बंदोबस्तात कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने महत्त्वाचे आदेश दिले.

Beed Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडचा पाय खोलात... 14 दिवसाची पोलीस कोठडी; कोर्टात काय काय घडलं?
Follow us
| Updated on: Jan 01, 2025 | 12:12 AM

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सीआयडी तपासाला प्रचंड वेग आला आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा आज स्वत:हून पुण्याच्या सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला. यानंतर नियमानुसार आरोपी वाल्मिक कराड याचं मेडिकल करण्यात आलं. त्यानंतर त्याला तातडीने बीडच्या केज कोर्टात आज रात्री उशिरा हजर करण्यात आलं. यावेळी आरोपीच्या रिमांडबाबत सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा जोरदार युक्तिवाद केला. तर वाल्मिक कराड सीआयडीला शरण आले आहेत. मग जामीन मिळायला हवा, असा युक्तिवाद कराडचे वकील अशोक कवडे यांनी केला आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

रात्री 10 वाजेनंतर केजच्या कोर्टात दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ऐकण्यासाठी कोर्टाच्या बाहेर कराड समर्थक आणि विरोधकांची तुफान गर्दी झाली होती. या पार्श्वभूमीवर कोर्ट परिसरात प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपला. त्यानंतर कोर्टाने हा मोठा निर्णय दिला आहे. सीआयडीने 15 दिवसाची कोठडी मागितली होती. पण कोर्टाने 14 दिवसाची कोठडी दिली आहे. सीआयडीचं हे मोठं यश असल्याचं सांगितलं जात आहे.

सरकारी वकील युक्तिवाद

हत्येचा मुख्य आरोपी सुदर्शन घुले फरार आहे. त्यामुळे कराडची कोठडी महत्त्वाची आहे.

हे सुद्धा वाचा

कराडच्या कोठडीशिवाय घुलेचा शोध घेणं कठीण आहे.

हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात कराडचा सहभाग आहे का हे तपासायचे आहे.

मोबाईलवरचं संभाषण हे कराडचंच आहे का हे तपासायचं आहे.

तपासासाठी कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी द्या

संतोष देशमुख हत्येत वाल्मिक कराडचा हात आहे का? हे तपासायचं आहे.

सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून काम करायचा.

वाल्मिक कराडने आणखी काही गुन्हे करून दहशत पसरवली आहे.

काम बंद करू, हातपाय तोडू अशी धमकी सुदर्शन घुलेने दिली होती

कराडचे वकील अशोक कवडे यांचा युक्तिवाद

फक्त खंडणी प्रकरणाचा आरोप आहे

कराडा हा गरीब सामाजिक कार्यकर्ता आहे

कराडांना या प्रकरणात जाणूबुजून अडकवलं जात आहे.

राजकीय द्वेषापोटी अडकवण्याचा प्रयत्न

2 कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप आहे, त्यातील किती पैसे दिले हे साांगा

2 कोटींची खंडणी मागितली हा फक्त आरोप आहे

आवाजाचे नमूने द्यायला तयार आहोत, पण कोठडी नको

कराड सरेंडर झाले, आता जामीन द्या

मीडिया ट्रायल पाहून कोर्टाने निर्णय घेऊ नये

कराडला न्यायालयीन कोठडी द्यावी

सर्व पेपर तुमच्याकडे आहे, तुम्ही तपास करा. 308 हे कलम चुकीच्या पद्धतीने लावलं जात आहे.

कोर्टाबाहेर दमदाटी

सीआयडी पथक आणि बीड पोलीस आरोपी वाल्मिक कराडला घेऊन केजमध्ये दाखल होत नाही त्याआधीच केज कोर्टाबाहेर मोठी गर्दी जमलेली होती. वाल्मिक कराडच्या समर्थकांनी आणि त्याच्या विरोधकांनी केज कोर्टाबाहेर मोठी गर्दी केलेली बघायला मिळाली. विशेष म्हणजे केज कोर्ट परिसरात त्याआधी वाल्मिक कराडच्या समर्थकांनी कोर्ट परिसरातील वाहनं बाहेर काढण्यावरुन कोर्ट कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्याचा प्रकारही समोर आला होता. यानंतर थोड्या वेळाने सुनावणीच्या पार्श्वभूमीवर वाल्मिक कराडचे समर्थक आणि विरोधकांनी केज कोर्टाबाहेर मोठी गर्दी केली.

केज कोर्ट परिसरात पोलिसांचा लाठीचार्ज

वाल्मिक कराड हा केज कोर्ट परिसरात सुनावणीसाठी दाखल झाल्यास कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी पोलिसांकडून घेण्यात आली. त्यामुळे वाल्मिक कराड कोर्ट परिसरात दाखल होण्याआधी पोलिसांनी केज कोर्ट परिसरात जमलेल्या गर्दीला हटवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. सर्व गर्दी दूर बाजूला सारण्यात आली. त्यानंतर थोड्या वेळाने वाल्मिक कराडला तिथे आणण्यात आलं.

केज कोर्ट परिसरात 100 पेक्षा जास्त पोलीस

विशेष म्हणजे सुनावणीच्या वेळी केज कोर्टाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. तब्बल 7 पोलीस अधिकारी आणि 47 पोलीस कर्मचारी, 2 RCP प्लॅटून आणि 1 SRP प्लॅटून असा जवळपास 100 ते 125 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. विशेष म्हणजे या काळात कोर्ट परिसरात नागरिकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.