AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाच शाळेतील 40 विद्यार्थ्यांना कोरोना, 320 विद्यार्थी, 10 शिक्षक, 20 कर्मचारी क्वारंटाईन, महाराष्ट्राला हादरे सुरुच

 लातूर शहरातल्या एकाच शाळेत तब्बल 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. | Latur Government Hostel 40 Student Tested Corona Positive

एकाच शाळेतील 40 विद्यार्थ्यांना कोरोना, 320 विद्यार्थी, 10 शिक्षक, 20 कर्मचारी क्वारंटाईन, महाराष्ट्राला हादरे सुरुच
लातुरातील 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
| Updated on: Feb 23, 2021 | 12:23 PM
Share

लातूर :  लातूर शहरातल्या एकाच शाळेत तब्बल 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. 40 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचं समोर आल्याने 320 विद्यार्थी, 10 शिक्षक, 20 कर्मचारी क्वारंटाईन झाले आहेत. (Latur Government Hostel 40 Student Tested Corona Positive)

एमआयडीसी भागात असलेल्या पब्लिक शाळेच्या वसतिगृहातील 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे विद्यार्थी शिक्षणासाठी लातूरच्या या शाळेच्या वसतिगृहात रहायला आहेत.

लातूरच्या एमआयडीसी भागात एक सीबीएसई स्कूल आहे. या स्कूलच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीमध्ये कोरोनाची पहिल्यांदा लक्षणे आढळली. त्या नंतर इतर विद्यार्थ्यांची तपासणी केली असता तब्बल 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या विद्यार्थ्यांवर लातूरच्या शासकीय वसतिगृहात असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार सुरु आहे.

लातूरमध्ये सध्या कोरोनाची परिस्थिती काय?

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. राज्यांतल्या विविध शहरांत कोरोनाचे अधिकाधिक संख्येने रुग्ण मिळत आहेत. लातूरातही काल (सोमवारी) एकाच दिवशी 35 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर दुर्दैवीरित्या 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

लातुरात आतापर्यंत 24 हजार 901 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 23 हजार 856 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. तर जवळपास 150 रुग्णांवर शहरातल्या विविध रुग्णांलयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर काही रुग्ण होम क्वारंटाईन आहेत.

लातूर महानगरपालिकेची तयार काय?

शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढायला सुरुवात झाल्यापासून महापालिका अॅक्शन मोडमध्ये आहेत. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर महापालिका कारवाई करत आहे. जो नागरिक विनामास्क फिरेल त्याच्याकडून 100 रुपये दंड वसूल केला जात आहे तर तोच नागरिक दुसऱ्यांदा विनामास्क आढळला तर त्याच्याकडून 500 रुपये दंड घेतला जात आहे.

नागरिकांनी नियम पाळावेत. शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन नागरिकांनी करुन शासन आणि प्रशासनाला सहकार्य करावं, असं सांगत सध्या तरी लातुरात लॉकडाऊनचं कुठलंही प्रयोजन नाही मात्र नागरिकांनी नियम पाळले नाही तर कठोर पावलं उचलावी लागतील, असा इशारा लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

(Latur Government Hostel 40 Student Tested Corona Positive)

हे ही वाचा :

तुळजाभवानी मंदिरात कोरोना नियमांचं उल्लंघन, व्यापारी, पुजारी, भाविक विनामास्क, सॅनिटायझिंगही नाही!

कोरोनाचा कहर, शेगावचं गजानन मंदिर भाविकांसाठी बंद, प्रशासन अलर्ट मोडवर!

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.