Latur | पेट्रोल पंपावरून निघाले अन् भरधाव टेम्पोखाली सापडले, लातूर जिल्ह्यात भीषण अपघात, दोन ठार, एक जखमी
मोटर सायकलवर निघालेले हे तिघे जण चेरा येथील रहिवासी होती. चेरा येथून ते जांबच्या दिशेने निघाले होते. जांब जवळच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून रस्त्यावर येताच त्यांना भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने धडक दिली.
लातूरः लातूर जिल्ह्यात एक भीषण अपघाताची (Latur accident) घटना घडली आहे. टेम्पोने मोटरसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत दोन तरुण जागीच (Accidental death) ठार झाले तर तिसरा एक जण गंभीर जखमी झाला आहे. जांब ते शिरूर-ताजबंद रस्त्यावर हा अपघात झाला. रस्त्यावरून धावणाऱ्या टेम्पोने (Tempo accident) भरधाव वेगाने येत या मोटरसायकलला धडक दिली. त्यामुळे मोटरसायकलवरील तिघांनाही अपघात झाला. यापैकी दोघेजण जागीच ठार झाले तर तिसरा तरुण जखमी आहे. पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीत हा भीषण अपघात कैद झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मिडियावरही व्हायरल झालाय. अपघातानंतर आजूबाजूचे लोक तत्काळ तरुणांच्या मदतीसाठी धावले. मात्र दोन तरुण जागीच ठार झाले. तर जमलेल्या नागरिकांनी तिसऱ्या तरुणाला तत्काळ उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
पेट्रोल भरल्यानंतर निघाल्यावर अपघात
याविषयी अधिक माहिती अशी की, मोटर सायकलवर निघालेले हे तिघे जण चेरा येथील रहिवासी होती. चेरा येथून ते जांबच्या दिशेने निघाले होते. जांब जवळच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून रस्त्यावर येताच त्यांना भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने धडक दिली. यात मोटर सायकलवरील दोघांचा मृत्यू झाला.
दोघांचा मृत्यू, तिसरा जखमी
जांब ते शिरूर ताजबंद या रस्त्यावर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दिगंबर राजगीरवाड (वय वर्षे 32 ) आणि परमेश्वर कावलवाड (वय वर्षे 22) या दोघांचा समावेश आहे. तर सुधाकर पोकलवाड (30 वर्षे) हा तरुण जखमी झाला आहे. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पेट्रोल पंपावरुन निघाल्यानंतर भीषण अपघात, लातूर जिल्ह्यातली चेरा येथील थरारक अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/EXaQRywSvh pic.twitter.com/rPEQfWpEFU
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 18, 2022
सीसीटीव्हीत अपघात कैद
दरम्यान, पेट्रोलपंपावरून बाहेर पडणाऱ्या या तरुणांचा अपघात किती भीषण पद्धतीने झाला, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पंपातून निघालेल्या या तिघांना रस्त्याच्या उजवीकडून येणाऱ्या टेम्पोचालकाने धडक दिली आणि मोटरसाकलसहित तिघेही घसरत गेले.
इतर बातम्या-