“जातीयवादी संघटनेचं आंदोलन हे एक नाटक”; ठाकरे गटानं नामांतराच्या आंदोलनावर आसूड ओढले
औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असं नामाकरण करण्यात आल्यानंतर आता हा वाद आणखी चिघळला आहे. त्यामुळे राज्यातील वाद चिघळला आहे. त्यामुळेच आता या आंदोलनावर जातीयवादाचा ठपका ठेवण्यात आला आहे.
औरंगाबादः एमआयएमचे नामांतराविरोधात आंदोलन सुरु आहे त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हे आंदोलन म्हणजे नाटक असल्याटी टीका केली आहे. औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यात आले. त्यानंतर एमआयएमने औरंगजेबाचे उदात्तीकरण करत नामांतराविरोधात आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांनी त्यांच्याविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे.
औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आल्यानंतर एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून आंदोलन पुकारण्यात आले.
यावेळी या आंदोलनामध्ये औरंगजेबाचे फोटोही झळकवण्यात आले. त्यामुळे या जातीयवादी संघटनेवर आणि आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही अंबादास दानवे यांनी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर असं नामांतर करण्यात आल्यानंतर या शहरातील जातीयवादी संघटनेने आंदोलन पुकारलेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.
अंबादास दानवे यांनी या पक्षावरच कारवाई करण्याची मागणी केली आहे. एमआयएमकडून दिवसा तिथे उपोषण केले जाते आणि रात्रीच्यावेळी मात्र तिथे बिर्याणी खाल्ली जाते असा आरोपही जलील यांच्यावर करण्यात आला आहे. रात्रीच्या दहा वाजल्यानंतर लाऊडस्पीकरवर बंदी असतानाही त्या ठिकाणी लाऊडस्पीकर लावले गेले आहेत.
त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.या आंदोलनाच्या निमित्ताने औरंगजेबाचे उदात्तीकरण केले जात असल्याची टीकाही त्यांनी एमआयएमवर केली आहे.
तसेच याच आंदोलनात औरंगजेब हा बाप होता अशी वक्तव्यही वारंवार केली गेली आहेत. त्यामुळे अशा प्रकारची आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही एमआयएमवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे आंदोलन एक प्रकारचे नाटक असून यानिमित्ताने या जातीयवादी पक्षाकडून औरंगजेबाचे उदात्तीकरण केले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.