VIDEO: आमदार, मंत्री मिळतो, पण नेता मिळत नाही, जानकरांची पंकजांसाठी जमावाला हाक
आरशासमोर भाषण केल्याने कोणी नेता होत नाही. आमदार, मंत्री मिळतो. पण नेता मिळत नाही. नेता विकत घेता येत नाही, बनवता येत नाही. (leaders never die, says mahadev jankar)

बीड: आरशासमोर भाषण केल्याने कोणी नेता होत नाही. आमदार, मंत्री मिळतो. पण नेता मिळत नाही. नेता विकत घेता येत नाही, बनवता येत नाही. रक्तातच असावं लागतं. रक्तच असावं लागत, असं सांगत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी जमावाला हाक दिली.
महादेव जानकर यांनी बीड येथील दसरा मेळाव्यात तडाखेबंद भाषण केलं. नेता विकत घेता येत नाही, बनवता येत नाही. रक्तातच असावं लागतं. रक्तच असावं लागत. आरशासमोर भाषण केल्याने नेता होत नाही. नकली ते नकलीच असतं. नेता व्हायला अक्कल लागते, असं जानकर म्हणाले.
नेता कधी मरत नसतो
आजचा प्रोग्राम राजकीय नाही. हा पंकजाताईंच्या शक्ती आणि युक्तीचा कार्यक्रम आहे. आमदार, खासदार मिळतो पण नेता मिळत नाही. नेत्याला सांभाळणं हे आपलं काम आहे. गोपीनाथ मुंडेंनी वंचितांची मोट बांधली. त्या पंकजा मुंडेच्या पाठी खंबीर राहा. मंत्री येतो आणि जातो. पण नेता कधी मरत नसतो. सावरगावची निर्मिती कुणी केली. हू ईज क्रिएटर ऑफ सावरगाव? पंकजा यांचं हेलिकॉप्टर फिरलं नाही तर इथे आमदार खासदार तरी होतील का? असा सवाल करतानाच सत्तेसाठी आम्ही भीक मागत नाही. सत्ता येईल पण जाईल. आम्ही गद्दार होणार नाही, लाचार होणार नाही. भीक मागून सत्ता मिळवणार नाही. सत्ता येईल आणि जाईल पण नेता कधी मरू देऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं.
सत्तेसाठी लाचार नाही
सत्तेसाठी आम्ही भीक मागत नाही. सत्ता येईल पण जाईल. आम्ही गद्दार होणार नाही, लाचार होणार नाही. भीक मागून सत्ता मिळवणार नाही. सत्ता येईल आणि जाईल पण नेता कधी मरू देऊ नका. हा महादेव जानकर मेला तरी चालेल पण महादेव जानकर पंकजाताई तुला सोडणार नाही. 31 मेला गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर केलं होतं, अशी आठवण जानकर यांनी सांगितली.
पंकजा आपली आई
पंकजा मुंडेंनी काय केलं मंत्री सोडून द्या, या देशाचा कारवा कसा चालवावा हे पंकजांनीच दाखवून दिलं. माझा वेळ ताईला देऊ द्या. एखादा मुलगा मेला तरी चालेल आई मरता कामा नये. पंकजा मुंडेही आपली आई आहे. काही लोकं हेमामाालिनीचा मुखवटा लावून येतील पण ती तुमची आई होणार नाही. ती बाई असू शकेल. पंकजा ही आई आहे. ती म्हणते त्यांना निवडून द्या. पंकजा मुंडेंनी सर्वाधिक निधी आणला. मीही निधी दिला. आता बीड जिल्ह्यात निधी नाही, असं महादेव जानकर म्हणाले.
संबंधित बातम्या:
VIDEO: सरकार पडणार की नाही या भूमिकेतून बाहेर पडा; पंकजा मुंडेंचा भाजपला घरचा आहेर