AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठवाड्याचा ‘छोटा समुद्र’ भरला, दशकाच्या सुरुवातीला जायकवाडी 100 टक्के फुल्ल, शेती आणि पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली

आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी धरण यावर्षी तब्बल 95 टक्के भरलं आहे. हे धरण एका दशकात फक्त दोन ते तीन वेळा भरत असतं मात्र दशकाच्या पहिल्याच वर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे.

मराठवाड्याचा 'छोटा समुद्र' भरला, दशकाच्या सुरुवातीला जायकवाडी 100 टक्के फुल्ल, शेती आणि पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली
जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 3:34 PM

औरंगाबाद : आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी धरण यावर्षी तब्बल 95 टक्के भरलं आहे. हे धरण एका दशकात फक्त दोन ते तीन वेळा भरत असतं मात्र दशकाच्या पहिल्याच वर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे. इतकंच नाही तर धरणाचे 8 दरवाजे अर्धा फुटाने उचलून तब्बल 10 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यात उत्साहाचं वातावरण आहे.

आशियातील सर्वांत मोठं मातीचं धरण भरलं

जायकवाडी धरण… 60 किलोमीटरची लांबी आणि दहा किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या धरणाची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे. जायकवाडी धरणाची तब्बल 102 TMC पाणीसाठ्याची क्षमता आहे. हे धरण एकदा जर पूर्ण भरले तर 2 वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि 4 वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते, म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो.

5 जिल्हे जायकवाडीवर अवलंबून

जायकवाडी धरणावर मराठवाड्यातील पाच जिल्हे अवलंबून असतात, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे जिल्हे जायकवाडी धरणावर थेट अवलंबून आहेत. तर परळी इथलं वीजनिर्मिती करणारं थर्मल सुद्धा याच पाण्यावर अवलंबून असतं.

जायकवाडी धरणाला उजवा आणि डावा असे दोन कालवे आहेत. या कालव्यातून मराठवाड्यातल्या पाचही जिल्ह्यातील शेतीसाठी पाणी सोडलं जातं. यातल्या डाव्या कालव्याची लांबी ही तब्बल 208 किलोमीटर आहे. जायकवाडी धरणातून तब्बल अडीच ते तीन लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडलं जातं.

चारशे गावांची तहान जायकवाडी भागवतं

याच धरणावर औरंगाबाद आणि जालना या दोन महानगराच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तर तब्बल चारशे गावांची तहानाही जायकवाडी धरण भागवत असतं, वाळूज, शेंद्र, चिखलठाणा, पैठण आणि जालना औद्योगिक वसाहती सुद्धा याच धरणावर अवलंबून आहेत. त्यामुळे जायकवाडी धरण भरणं म्हणजे मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणे असंही समजलं जातं.

धरणातून विसर्ग सुरु, नागरिकांनो काळजी घ्या, सतर्क राहा : राजेश टोपे

जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीमध्ये झपाटयाने वाढ होत आहे.धरणाचा जलसाठा 95% झाल्याने गोदावरी नदीमध्ये जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी.

पुर्वानुभव पाठीशी धरुन गोदाकाठच्या गावात राहणा-या सर्व नागरिकांनी शेतामध्ये असणारा शेतीमाल, शेतीऔजारे तसेच पाळीव प्राणी, जनावरे यांना सुरक्षित स्थळी हलवणे गरजेचे आहे. घरामध्ये राहणारे वयोवृध्द, लहान मुलं, महिला या सर्वांना सुरक्षित ठिकाणीच ठेवणे आवश्यक आहे. कोणाच्याही मालाची अथवा जिवीत हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

गावातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्रित मिळुन गावकऱ्यांची काळजी घ्यवी. कुठलीही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांना सतर्क राहून त्याबाबतच्या उपाययोजना त्वरेने करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

(Maharashtra Aurangabad Jayakwadi Dam overflow Concerns over agriculture and drinking water disappeared)

हे ही वाचा :

धीर सोडू नका, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार, मुख्यमंत्र्यांचा शब्द

PHOTO: नाशिकमध्ये गोदावरीला वर्षातला चौथा पूर

Marathwada rain : आधीच पावसानं धुतलं, त्यात जायकवाडीचे तब्बल 18 दरवाजे उघडले, मराठवाड्यात पूरस्थिती

पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच.
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'.
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर.
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल.
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द.
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं.
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.
आयएमएफकडून मिळालेल्या पैशातून पाकिस्तान टेरर फंडिंग करतो - राजनाथ सिंह
आयएमएफकडून मिळालेल्या पैशातून पाकिस्तान टेरर फंडिंग करतो - राजनाथ सिंह.