मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली, पावसानं पिकं पिवळी पडली, कापूस, सोयाबीनला धोका

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सततच्या पावसानं शेतातील पिकं पिवळी पडली आहेत.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली, पावसानं पिकं पिवळी पडली, कापूस, सोयाबीनला धोका
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 10:55 AM

औरंगाबाद: पावसानं दडी मारल्यामुळे दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यासमोर आता नवं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सततच्या पावसानं शेतातील पिकं पिवळी पडली आहेत. बीड, औरंगाबाद,परभणी, जालना,लातूर, उस्मानाबाद, जालना,हिंगोली,नांदेड जिल्ह्यातील पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

पावसानं पिकं पिवळी पडली

मराठवाड्यातील शेतकऱ्यांची सततच्या पावसानं चिंता वाढली आहे.सततच्या पावसाने पिके पिवळी पडली आहेत. बीड, औरंगाबाद,परभणी, जालना,लातूर, उस्मानाबाद, जालना,हिंगोली,नांदेड जिल्ह्यात सातत्यानं पाऊस होत असल्यानं पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

कापूस, सोयाबीन सह कडधान्याची पिकं हातून जाण्याचा धोका मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसाने कापूस, सोयाबीन,तूर,मूग,उडीद,पिकांना धोका निर्माण झाला आहे. चार दिवसांपासून सतत पाऊस होत असल्यानं शेताचे तळे झाले आहे. पाऊस असा कायम राहिल्यास आणि पिकांमध्ये पाणी साचल्यास पिकांचं मोठ्य़ा

राज्य सरकारकडून पंचनाम्याचे आदेश

महापूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्यातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शेतीच्या नुकसानाचे पंचनामेही 48 तासांत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वैयक्तिक स्तरावर पंचनामे करण्याचे राज्याच्या कृषी विभागानं आदेश दिले आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. लवकरात लवकर पंचनामे करुन भरपाई निश्चित करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

नुकसानाची माहिती प्रशासन, विमा कंपन्यांना देण्याचं आवाहन

खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात राबविली जात आहे. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिमेच्या बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते. जुलै महिन्यामध्ये काही भागात अतिवृष्टीने तसेच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झल्याने शेत पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. पीक विमा संरक्षण घेतलेल्या अधिसूचित पिकांचे उपरोक्त बाबीमुळे नुकसान झाल्यास पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पिक नुकसानीच्या पूर्वसूचना शेत पिकांचे नुकसान झाल्यापासून 72 तासांमध्ये विहित मार्गाने विमा कंपनीस देणे आवश्यक आहे.

इतर बातम्या:

कृषी पायाभूत सुविधा निधीद्वारे 746 कोटींचं वितरण, महाराष्ट्राला किती कोटी मिळाले?

Weather Update Today: कोकणाला दिलासा मिळणार? राज्यात पावसाची स्थिती कशी? हवामान विभागाचा नवा अंदाज नेमका काय?

Maharashtra rain update due to heavy rainfall effected crops in districts of Marathwada

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.