Aurangabad | औरंगाबाद-अहमदनगर-पुणे रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे शिफारस करावी, आमदार सतीश चव्हाण यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

जगप्रसिध्द अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी देश-विदेशातून दरवर्षी हजारो पर्यटक याठिकाणी भेटी देतात. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने औरंगाबाद-अहमदनगर-पुणे हा रेल्वे मार्ग झाल्यास पर्यटकांना रेल्वे मार्गाने प्रवास करणे अधिक सोयीचे होईल असे देखील आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.

Aurangabad | औरंगाबाद-अहमदनगर-पुणे रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे शिफारस करावी, आमदार सतीश चव्हाण यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना औरंगाबाद-अहमदनगर-पुणे रेल्वे मार्ग प्रकल्पासंदर्भात निवेदन देताना आ.सतीश चव्हाण. सोबत आ.विक्रम काळे, मा.आ.संजय खोडके...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 6:00 AM

औरंगाबादः  औरंगाबाद-अहमदनगर-पुणे (Aurangabad-Nagar-Pune) हा अतिशय महत्वाचा असलेला प्रस्तावित नवीन रेल्वे मार्ग (Railway) प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे शिफारस करावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आ.सतीश चव्हाण आज विधान भवन, मुंबई येथे अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्यात विविध रेल्वे प्रकल्पांच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र यातील अनेक रेल्वे प्रकल्प अजूनही कागदावरच आहे. औरंगाबाद-अहमदनगर-पुणे हा अतिशय महत्वाचा असलेला प्रस्तावित नवीन रेल्वे मार्ग करण्यासाठी मध्यंतरी खूप प्रयत्न सुरू होते. या नवीन रेल्वे मार्गासाठी रेल्वेच्या अधिकार्‍यांनी भेट देऊन या मार्गाच्या उपयुक्ततेबाबत चाचपणी केली. मात्र प्रत्यक्षात औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्गाचेच सर्वेक्षण करण्यात आले असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले.

औरंगाबाद-नगर-पुणे रेल्वेमार्ग का महत्त्वाचा?

औरंगाबाद-अहमदनगर-पुणे हा रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यास औद्योगिकदृष्ट्या महत्वपूर्ण ठरणार आहे. या मार्गामुळे वाळूज, रांजणगाव, शेंद्रा, सुपा, चाकण या औद्योगिक वसाहतींना मोठा फायदा होणार आहे. तसेच यामुळे ‘आयटी हब’ पुणे व औरंगाबाद येथील ‘ऑरिक सिटी’ला थेट ‘कनेक्टिव्हिटी’ मिळण्याच्या दृष्टीने मदत होणार असून या माध्यमातून मराठवाड्यातील तरूणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे सतीश चव्हाण यांनी अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच पर्यटनाची राजधानी म्हणून औरंगाबाद जिल्ह्याची ओळख झाली आहे. जगप्रसिध्द अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी देश-विदेशातून दरवर्षी हजारो पर्यटक याठिकाणी भेटी देतात. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने औरंगाबाद-अहमदनगर-पुणे हा रेल्वे मार्ग झाल्यास पर्यटकांना रेल्वे मार्गाने प्रवास करणे अधिक सोयीचे होईल असे देखील आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.

अजित पवार यांचा सकारात्मक प्रतिसाद

आमदार सतीश चव्हाण यांनी दिलेल्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांना आश्वस्त केले. यावेळी आमदार विक्रम काळे, आमदार संजय खोडके यांची देखील उपस्थिती होती.

इतर बातम्या-

Dombivli Crime : डोंबिवलीत किरकोळ कारणावरून युवकाला मारहाण, सीसीटीव्ही बघाल तर थक्क व्हाल

Buldana Market | महागाई आणि चारा टंचाईमुळे जनावरे विक्रीस, खामगाव बाजारात कवडीमोल भाव

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.