Nanded | बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांच्या नांदेडात चाललंय काय? पक्क्या सिमेंटच्या रस्त्याचं डांबरीकरण, इंजिनिअरचं सुपीक डोकं की निधी लाटायचं षड्यंत्र?

नांदेडच्या तरोडा खुर्द या उपनगरात सिमेंटचे व्यवस्थित रस्ते असताना त्यावर डांबर अंथरून निधी लाटण्याचा उद्योग सुरू आहे. चक्क बांधकाम मंत्र्याच्याच जिल्ह्यांत निधीची विल्हेवाट लावण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय.

Nanded | बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांच्या नांदेडात चाललंय काय? पक्क्या सिमेंटच्या रस्त्याचं डांबरीकरण, इंजिनिअरचं सुपीक डोकं की निधी लाटायचं षड्यंत्र?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 9:37 AM

नांदेड: सिमेंटचे रस्ते व्यवस्थित असताना त्यावर डांबर अंथरणं हे किती उपद् व्यापी कृत्य आहे. पण हा प्रकार सुरु आहे. तो सुद्धा कुठे घडतोय, तर बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या नांदेडमध्ये. नांदेड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी मोठा डांबर घोटाळा उघडकीस आला होता. गंगापूरचे (Gangapur) आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) हे या घोटाळ्याचा आजही पाठपुरावा करतायत. तरी देखील नांदेडमध्ये बांधकाम विभाग आपल्या कार्यपद्धतीत बदल करायला तयार नाहीये, नांदेडच्या तरोडा खुर्द या उपनगरात सिमेंटचे व्यवस्थित रस्ते असताना त्यावर डांबर अंथरून निधी लाटण्याचा उद्योग सुरू आहे. चक्क बांधकाम मंत्र्याच्याच जिल्ह्यांत निधीची विल्हेवाट लावण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय.

कुणा इंजिनिअरच्या सुपिक डोक्यातली कल्पना?

देशातील बहुतांश रस्ते हे सिमेंटचे करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. डांबरा ऐवजी सिमेंटचे रस्ते हे जास्त टिकाऊ आणि दर्जेदार असतात अस आता सिद्ध झालंय, त्यातच डांबराचे द्रव्य आयात करावे लागते त्यातून भारतीय चलन देखील परदेशात पाठवावे लागते. त्यामुळे डांबराऐवजी सिमेंटच्या रस्त्यांना प्राधान्य देण्यात येतंय. मात्र राज्याच्या बांधकाम मंत्र्यांच्या जिल्ह्यात चक्क सिमेंटच्या रस्त्यावर डांबर टाकून रस्ता बनवण्यात येतोय. नांदेडच्या तरोडा खुर्द भागात असे काही रस्ते बनवण्यात येतायत. तुळशीरामनगरात अवघ्या एकाच दिवसात सिमेंटच्या रस्त्याला डांबरी रस्त्याचे रूप देण्यात आलंय. नेमका हा उलटा उद्योग कुण्या सुपीक इंजिनिअरची डोक्यातील कल्पना असावी यावर आता नांदेडकर चवीने चर्चा करत आहेत.

हे सुद्धा वाचा

अशोक चव्हाणांचं लक्ष आहे का?

नांदेडमध्ये सध्या बांधकाम मंत्र्यांनी शहराच्या विकासासाठी मोठा निधी खेचून आणला. हे रस्ते दर्जेदारच व्हावेत यासाठी त्यांनी कंत्राटदाराना तंबीही दिली होती. मग त्यांच्याच नांदेडमध्ये सिमेंटच्या रस्त्याचे डांबरी रस्त्यात रूपांतर करण्याची कालबाह्य कल्पना कशी काय अंमलात आली याची आता चवीने चर्चा रंगलीय. नांदेडमध्ये बांधकाम खात्यात मनमानी करणाऱ्या काही अधिकाऱ्यांचे प्रस्थ वाढले आहे असा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केला होता, या घटनेमुळे आमदार प्रशांत बंब यांचा आरोप नांदेडकरांना खरा वाटला तर त्यात नवल काय असा प्रश्न आता उपस्थित झालाय. त्यामुळे मंत्री चव्हाण यांच्या जनमानसातील प्रतिमेला तडा जातोय, हे अशोक चव्हाणांनी लक्षात घ्यायला हवं.

मंत्री एकनाथ शिंदेंच्या निधीचा दुरुपयोग

राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडच्या विकासासाठी भरीव निधी दिलाय. त्यातून नांदेडमध्ये छोट्या छोट्या गल्लीबोळात रस्त्याचे नूतनीकरण होतंय पण जिथे गरज नाही तिथे देखील अश्या प्रकारे निधीचा गैरवापर होत असेल तर या प्रकाराला म्हणावे तरी काय असा सवाल नांदेडकर उपस्थित करत आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी करांच्या रूपात सरकारकडे जमा केलेला पैसा कंत्राटदाराना पोसण्यासाठी आहे का असा सवाल या निमित्ताने चर्चिल्या जातोय. मंत्री एकनाथ शिंदे यांना देखील निधी देतांना विचार करायला भाग पाडणारी ही घटना आहे.

ऐन पावसाळ्यात डांबरीकरणाचं कारण काय?

नांदेडमध्ये आता मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. कधीही मोठ्या पावसाचे आगमन नांदेडमध्ये होऊ शकते. अश्या परिस्थितीत ऐन पावसाळ्याच्या तोंडावर केलेला डांबरी रस्ता एखाद्याच अतिवृष्टीत वाहून जाण्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नांदेडमध्ये सिमेंटच्या रस्त्यावर रातोरात डांबर टाकून घिसाडघाईने उरकण्यात येणाऱ्या या कामामागचे गौडबंगाल तरी नेमके आहे काय असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय. या प्रकाराची राज्याच्या बांधकाम मंत्र्यासह मुख्यमंत्र्याकडे विरोधक तक्रार करणार असून चौकशीची मागणी करणार आहेत.

सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.