Nanded | माहूर नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे फेरोज दोसानी, नांदेड काँग्रेसला मोठा झटका, शिवसेना किंगमेकर!

शिवसेनेने आज राष्ट्रवादीला पाठींबा दिल्याने काँग्रेसला मोठा झटका बसलाय. तर या निवडणुकीत भाजपाचा असलेला एकमेव सदस्य तटस्थ राहिलाय. नगराध्यक्षपदाची घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जल्लोष करत घोषणाबाजी केली.

Nanded | माहूर नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे फेरोज दोसानी, नांदेड काँग्रेसला मोठा झटका, शिवसेना किंगमेकर!
माहूर नगरपंचायतीसाठी आज नगराध्यक्षपदाची निवड
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 12:17 PM

नांदेड | माहूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे फेरोज दोसानी (Feroj Dosani) यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या या निवडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पहायला मिळाली. जिल्ह्यातील अर्धापूर, नायगाव आणि माहूर नगरपंचायतींसाठी निवडणुकांमध्ये आर्धापूर आणि नायगावमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. मात्र माहूर नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेची आघाडी घेतल्याने नगराध्यक्ष पद कुणाकडे जाते, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या शिवसेनेने किंगमेकरची भूमिका बजावत काँग्रेसला (Nanded Congress) जबरदस्त झटका दिला. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने याच पक्षाच्या फेरोज दोसानी यांच्या गळ्यात अखेर नगराध्यक्षपदाची माळ पडली. नांदेड काँग्रेस आणि पर्यायानं मंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी हा मोठा झटका समजला जात आहे.

Nanded Mahur Mayor

राष्ट्रवादीचे फेरोज दोसानी यांची माहूरच्या नगराध्यक्षपदी निवड

शिवसेना किंगमेकर, काँग्रेसला झटका

माहूर नगरपंचायत निवडणुकीत अध्यक्षपदाचं राजकारण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच रंगलं होतं. ते केवळ माहूरपुरतं मर्यादित न राहता किनवट- माहूर विधानसभा मतदारसंघापर्यंत पोहोचलं होतं. माहूर नगरपंचायतीच्या मतदानात पुढीलप्रमाणे पक्षीय बलाबल दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस- 7 काँग्रेस- 6 शिवसेना- 3 भाजप- 1 एकूण- 17 नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने अल्पसंख्याक मुस्लिम तरुण फिरोज दोसानी यांना पुढे केले होते. पक्षीय बलाबल आणि महालिकास आघाडीतील सूत्रानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकार असताना काँग्रेसने विनाकारण अध्यक्षपदावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुस्लिम समाजातून रोष व्यक्त केला गेला. त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक काँग्रेससोबत सहलीला गेल्याच्या चर्चाही होत्या. अखेर शिवसेनेने राष्ट्रवादीला पाठींबा दिला आणि काँग्रेसला झटका दिल्याचे पहायला मिळाले.

भाजपचा एकमेव सदस्य तटस्थ

तीर्थक्षेत्र माहूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी सेनेच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे फेरोज दोसानी विजयी झालेत. सहा सदस्य असलेल्या काँग्रेसने शिवसेनेच्या पाठिंब्याने नगराध्यक्ष पदासाठी जुळवाजुळव केली होती. पण शिवसेनेने आज राष्ट्रवादीला पाठींबा दिल्याने काँग्रेसला मोठा झटका बसलाय. तर या निवडणुकीत भाजपाचा असलेला एकमेव सदस्य तटस्थ राहिलाय. नगराध्यक्षपदाची घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जल्लोष करत घोषणाबाजी केली.

इतर बातम्या-

VIDEO: हमने बहोत बर्दाश्त किया, बर्बादही हम करेंगे; शिवसेना नेते संजय राऊतांची डरकाळी

Pune Metro | पुणे मेट्रोश्रम साधकांचा पुष्पा अभिषेक सोहळा; चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पुष्प उधळून त्यांचा सन्मान…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.