AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded | नांदेड मनपात राडा, पाणी प्रश्नावरून वाद, सर्वसाधारण सभेत काँग्रेस नगरसेवक भिडले!

कोण बोलणार यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. दोघे एकमेकांच्या अंगावर धावून आले , या दरम्यान इतर नगरसेवकांनी मध्यस्थी करत दोघांना वेळीच आवरले. पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याने सध्या नांदेडकर त्रस्त असल्याने मनपाच्या सभागृहात त्याचे पडसाद उमटल्याचे दिसलंय.

Nanded | नांदेड मनपात राडा, पाणी प्रश्नावरून वाद, सर्वसाधारण सभेत काँग्रेस नगरसेवक भिडले!
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 12, 2022 | 9:52 AM
Share

नांदेडः नांदेड महापालिकेच्या (Nanded Municipal corporation) अर्थसंकल्पीय सभेत बुधवारी कोणताही करवाढ नसलेला अर्थसंकल्प बहुमताने मंजूर करण्यात आला. नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब ठरली. मात्र महापालिकेच्या काल रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या सभेत काँग्रेस नगरसेवकांनी (Congress corporator) चांगलाच राडा घातला. अर्थसंकल्पावर नगरसेवक चर्चा करत होते. उपाययोजना सूचवत होते. अशा वेळी सत्ताधारी काँग्रेसच्या 2 नगर सेवकांमध्ये शाब्दिक चकमक घडली. अर्थसंकल्पीय सभा असली तरी पाणी पुरवठ्याच्या मुद्यावरून नगरसेवक प्रशासनावर चांगलेच आक्रमक (Nanded Rada) झाले होते. काँग्रेसचे नगरसेवक शमीम अब्दुल्ला आणि संजय पांपटवार हे दोघेही एकाचवेळी बोलण्याचा प्रयत्न करत होते. कोण बोलणार यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. दोघे एकमेकांच्या अंगावर धावून आले , या दरम्यान इतर नगरसेवकांनी मध्यस्थी करत दोघांना वेळीच आवरले. पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याने सध्या नांदेडकर त्रस्त असल्याने मनपाच्या सभागृहात त्याचे पडसाद उमटल्याचे दिसलंय.

नेमकं काय घडलं?

अर्थसंकल्पवर चर्चा सुरु असताना नगरसेवक एकानंतर एक बोलत होते. यावेळी स्वीकृत नगरसेवक संजय पांपटवार बोलण्यासाठी उभे राहिले. त्याचवेळी माजी सभापती शमीम अब्दुल्ला हेही बोलण्यासाठी उभे राहिले. पांपटवार यांनी महापौरांची परवानगी घेऊन बोलत आहे, असे सांगितले. मात्र शमीम अब्दुल्ला यांनी आपल्यालाच बोलायचे आहे, असा आग्रह धरला. हा विषय सुरु असतानाच शमीम अब्दुल्ला यांनी आम्ही निवडून आलो आहोत, तुम्ही नव्हे… असे वक्तव्य केल्यामुळे सभागृहात एकच गोंधळ माजला. या वक्तव्यावरून सभागृहातील इतर स्वीकृत नगरसेवकांनीही पांपटवार यांची बाजू घेत शमीम अब्दुल्ला यांना विरोध दर्शवला. पांपटवार आणि शमीम अब्दुल्ला हे आमने-सामनेही आले . मात्र इतर नगरसेवकांनी हस्तक्षेप केल्यामुळे अनुचित प्रकार टळला.

ज्यावरून गदारोळ झाला, तो पाणीप्रश्न काय?

नांदेडमध्ये अनेक भागात पाच ते सहा दिवसाआड पाणी येत असल्याची बाब नगरसेवकांनी उपस्थित केली. तांत्रिक कारणामुळे हा उशीर होत असल्याचे सांगितले जाते. अधिकारी समाधानकारक उत्तरे देत नाहीत. काल झालेल्या सभेत अनेक नगरसेवकांनी हा विषय मांडला. यावेळी महापौर जयशस्री पावडे यांनी विशेष बैठक घेतली जाईल, असे आश्वासन दिले.

2022-23 चा अर्थसंकल्प सादर

महापालिका प्रशासनाने सादर केलेला 2021-22 चा मूळ अर्थसंकल्प 969 कोटी 32 लाखांचा होता. त्यात सुधारणा करून 2022-23 चा 1 हजार 95 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. हा 1 लाख 83 हजार 229 रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प होता. त्यानंतर स्थायी समितीने या अर्थसंकल्पात किरकोळ फेरबदल सूचवत, 42 कोटी 52 लाखांची वाढ सूचवली. स्थायी समितीने 1137 कोटी 86 लाखांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभे समोर ठेवला आणि तो बहुमताने मंजूर कऱण्यात आला.

3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.