Nanded Terrorist Connetion| दहशतवादी कनेक्शनमुळे नांदेड पोलिसांची झोप उडाली, रिंधाच्या साथीदारांवर धाडी, घराची झाडा-झडती

हरियाणा राज्यातील कर्नाल जिल्ह्यात पकडण्यात आलेल्या चार दहशतवाद्यांकडून विस्फोटक पदार्थ आणि अनेक हत्यारं, दारु गोळा जप्त करण्यात आलाआहे.

Nanded Terrorist Connetion| दहशतवादी कनेक्शनमुळे नांदेड पोलिसांची झोप उडाली, रिंधाच्या साथीदारांवर धाडी, घराची झाडा-झडती
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 4:36 PM

नांदेडः हरियाणा पोलिसांनी (Hariyana Police) गुरुवारी पकडलेल्या चार दहशतवाद्यांचे नांदेड कनेक्शन उघड झाल्याने नांदेड पोलीस सतर्क झाले आहेत. विशेष म्हणजे नांदेड आणि पंजाबमध्ये कुख्यात असलेला दहशतवादी रिंधा (Rindha) याच्यासाठी हे दहशतवादी काम करत असल्याचं उघड झाल्यामुळे नांदेड पोलिसांची (Nanded Police) झोप उडाली आहे. हे दहशतवादी नांदेडच्या दिशेने शस्त्रसाठा घेऊन येणार होते. त्यामुळे नांदेडसह महाराष्ट्रात काही घातपात घडवण्याचा त्यांचा डाव होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. नांदेड जिल्हा पोलीस दलाचे निसार तांबोळी, पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड व जिल्हा पोलीस प्रमुख प्रमोदकुमार शेवाळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. कुख्यात गुन्हेदार हरविंदरसिंग ऊर्फ रिंधा संधू याचं नांदेडमधील टोळीतील सर्व सदस्यांची व अभिलेखावरील गुन्हेगारांच्या घरांची झाडा-झडती घेण्याचं सत्र पोलिसांनी सुरु केलं आहे.

नांदेड पोलीस अॅक्टिव्ह, गुन्हेगारांवर करडी नजर

हरियाणा राज्यातील कर्नाल जिल्ह्यात पकडण्यात आलेल्या चार दहशतवाद्यांकडून विस्फोटक पदार्थ आणि अनेक हत्यारं, दारु गोळा जप्त करण्यात आलाआहे. गुरमित, अमनदीप, परमींदर आणि भूमींदर अशी या चार दहशतवाद्यांची नावं असून रिंधा त्यांच्यामार्फत नांदेडमध्ये शस्त्रसाठा पाठवत होता, असे उघड झाले आहे. कर्नाल पोलिसांच्या समयसूचकतेमुळे रिंधाचा हा प्रयत्न फसला, मात्र याआधी नांदेडमध्ये शस्त्रसाठा पोहोचलेला असू शकतो, या संशयातून नांदेडमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींची झाडाझडती घेतली जात आहे.

नांदेड पोलिसांची पथकं कामाला

या धाडसत्र व घरांची झाडाझडती घेण्यासाठी शहरातील एसआयटी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं अशा टीम कामाला लागल्या आहेत. हरियाणात पकडलेल्या दहशतवाद्यांचं नांदेड कनेक्शन काय आहे, हे तपासण्यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. रात्री आणि दिवसा अचानकपणे गुन्हेगारांच्या आणि रिंधा याच्या साथीदारांच्या घराची झडती घेतली जाऊन इतर तपास केला जात आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.