काँग्रेसमध्ये ज्यांचे कोणी नाही त्यांच्यासोबत मी आहे; नितीन राऊतांचा कार्यकर्त्यांना ग्वाही

| Updated on: Jun 13, 2021 | 7:40 AM

औरंगाबाद जिल्ह्यात कॉंग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका. काँग्रेसमध्ये ज्यांचे कोणी नाही त्यांच्यासोबत मही आहे, अशी ग्वाही ऊर्जा मंत्री नितीन राऊत (nitin raut) यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिली आहे.

काँग्रेसमध्ये ज्यांचे कोणी नाही त्यांच्यासोबत मी आहे; नितीन राऊतांचा कार्यकर्त्यांना ग्वाही
nitin raut
Follow us on

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात कॉंग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका. काँग्रेसमध्ये ज्यांचे कोणी नाही त्यांच्यासोबत मही आहे, अशी ग्वाही ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिली आहे. राऊत औरंगाबाद जिल्ह्यातील दौऱ्यावर आले होते. त्यावेळी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हा शब्द दिला आहे. (nitin raut addressed congress workers in aurangabad)

नितीन राऊत दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये होते. यावेळी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व माजी आमदार कल्याण काळे, माजी आमदार नारायण पवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मीनाताई शेळके, शहर अध्यक्ष हिशाम उस्मानी, महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे, महिला काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष सीमाताई थोरात उपस्थित होते. या सर्वांनी राऊत यांचा सत्कार केला.

काँग्रेसची विचारधारा ही राज्यघटनेची विचारधारा आहे. काँग्रेस केवळ एक पक्ष नसून एक विचार आहे. समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचे विचार हे काँग्रेसच्या राजकीय विचारधारेचा भाग आहेत, असं सांगतानाच काँग्रेसमध्ये ज्यांचे कोणी नाही त्यांच्यासोबत मी आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी आहेत आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आहेत. औरंगाबाद महानगरपालिका निवडणूकीत जी काही मदत लागेल ती काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष वा शहर अध्यक्ष यांनी सांगावी, मी मदत नक्की करेल, असा शब्द त्यांनी दिला.

औरंगाबादशी भावनिक जवळीक

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचे निर्माण केल्यानंतर औरंगाबाद शहराला शिक्षण क्षेत्रातील क्रांतीसाठी निवडले. म्हणून औरंगाबाद शहर मला अधिक प्रिय आहे. विदर्भ आणि मराठवाडयात अनेक साम्य आहेत, असे राऊत म्हणाले. औरंगाबाद शहराचे संपर्क मंत्री हे अमित देशमुख असून ते खूप चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. (nitin raut addressed congress workers in aurangabad)

 

संबंधित बातम्या:

2024नंतरही ‘ते’ भावी पंतप्रधानच असतील; अतुल भातखळकरांचं खोचक ट्विट

वारीची परंपरा टिकली पाहिजे, पण कुंभमेळ्यात घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दक्षता: अजित पवार

फडणवीसांच्या सरकारमध्ये शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

(nitin raut addressed congress workers in aurangabad)