AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवजयंतीवरुन धनंजय मुंडे म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना बोललो होतो, आता अजित पवार म्हणतात….

शिवजयंतीवरुन काही जण नाहक राजकारण करत आहेत, असे अजित पवार म्हणाले. (Shivjayanti issue Ajit Pawar)

शिवजयंतीवरुन धनंजय मुंडे म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना बोललो होतो, आता अजित पवार म्हणतात....
अजित पवार
| Updated on: Feb 15, 2021 | 5:43 PM
Share

औरंगाबाद : “शिवजयंतीवरुन काही जण नाहक राजकारण करत आहेत. शिवजयंतीला (Shivjayanti) बंधन का आणता?, अशी टीका केली गेली. पण कोरोना वाढतो आहे. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. या विषयावर राजकारण करून लोकांना कुणीही भावनिक करू नये,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. शिवजयंती संदर्भातला जीआर बदलवायला हवा असं सांगितलं यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं, असं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde) यांनी विधान केले होते. तसेच विरोधकांकडूनसुद्धा सरकारच्या या निर्णयावर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी वरील वक्तव्य केले. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. (no one have to politicize Shivjayanti issue says Ajit Pawar)

राजकारण करु नये

“काही लोक कोरोनाबाबत नाहक राजकारण करत आहेत. शिवजयंती साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला. काही जण शिवजयंतीला बंधन का आणता?, अशी टीका करत आहेत. पण कोरोना वाढतो आहे. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे या विषयावर राजकारण करून लोकांना कुणीही भावनिक करू नये,” असे अजित पवार म्हणाले.

कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन राज्य सरकारने शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी सरकारने काही निर्बंधासोबतच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याच मुद्द्यावरुन राज्यातील विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपने “सरकार राणीच्या बागेत पेंग्विन पाहायला लोकांना आमंत्रण देते, पण शिवजयंतीसाठी एकत्र जमण्याला सरकार परवानगी देत नाही,” अशा शब्दात सरकावर टीकेचे आसूड ओढले आहेत. विरोधकांच्या याच भूमिकेवर बोलताना अजित पवार यांनी वरील वक्तव्य केले.

पेंग्विन पाहायला आमंत्रण, शिवजयंतीसाठी जमण्याला परवानगी नाही

सराकरने शिवसजयंती साध्या पणाने साजरी करण्याचे आवाहन केल्यानंतर विरोधकांनी सरकारच्या या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. हे सरकार पेंग्विन पाहायला लोकांना आमंत्रण देते, पण शिवजयंतीसाठी एकत्र जमण्याला सरकार परवानगी देत नाही, असा सणसणी टोला, भाजपचे नेते आषिश शेलार यांनी ट्विटद्वारे लगावला होता.

या संदर्भात त्यांनी 12 फेब्रुवारी रोजी ट्विट केले होते. यामध्ये ते म्हणाले होते की, “भायखळ्याला पेंग्विन पहायला 16 फेब्रुवारीपासून याचचं हं! सरकारचं असं आमंत्रण आलंय बरं का! पण खबरदार जर जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला जमलात तर.. असे सरकारचे आदेश पण आलेत. त्यामुळे सांभाळा! अजब वाटले तरी नियम पाळा!! ठाकरे सरकार करेल, तेच नियम आणि तेच कायदे!”

दरम्यान, शिवजंयती संदर्भात भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सामंजस्याची भूमिका घेतली आहे. शिवाजी महाराज असते तर त्यांनीसुद्धा हाच निर्णय घेतला असता. त्यांनीसुद्धा नजतेच्या रक्षणालाच प्राधान्य दिले असते, असे वक्तव्य केले.

इतर बातम्या :

तयारीला लागा, राजेश टोपेंकडून परीक्षेची तारीख जाहीर, आरोग्य विभागात 50 टक्के जागा भरणार

शिवजयंतीवरुन राष्ट्रवादीची मोठी भूमिका, धनंजय मुंडे म्हणाले, आधीच मुख्यमंत्र्यांना बोललो होतो!

(no one have to politicize Shivjayanti issue says Ajit Pawar)

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.