औरंगाबादेतही जिनोम सिक्वेन्सिंग लॅब! विद्यापीठात की घाटी रुग्णालयात? तीन दिवसात निर्णय येणार!

महाराष्ट्रात मुंबई, पुण्यानंतर आता औरंगाबादेतही जिनोम सिक्वेन्सिंग लॅब सुरु होणार असून त्याच्या जागानिश्चिती येत्या तीन दिवसात होण्याची शक्यता आहे.

औरंगाबादेतही जिनोम सिक्वेन्सिंग लॅब! विद्यापीठात की घाटी रुग्णालयात? तीन दिवसात निर्णय येणार!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 7:10 AM

औरंगाबादः ओमिक्रॉनचे (Omicron) घोंगावणारे संकट लक्षात घेता, औरंगाबादेतही जिनोम सिक्वेन्सिंगची अद्ययावत लॅब असणे अत्यावश्यक झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आणि प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची ओमिक्रॉनची टेस्टही करणे आवश्यक आहे. कोरोना बाधित व्यक्तीला ओमिक्रॉन या कोरोनाच्या विशिष्ट व्हेरिएंटची बाधा झाली आहे का, हे पाहण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग लॅबद्वारे (Genome sequence lab) चाचणी करण्यात येते. मात्र महाराष्ट्रात फक्त मुंबई आणि पुणे याठिकाणीच जिनोम सिक्वेन्सिंग लॅब आहेत. त्यामुळे या दोन लॅबवरच खूप ताण असल्याने रुग्णांचे अहवाल येण्यासाठी सात दिवस प्रतीक्षा करावी लागते. या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत जिनोम सिक्वेन्सिंग लॅब सुरु करण्याचे प्रयत्न जिल्हा आणि राज्य स्तरावरून सुरु आहेत. दरम्यान, अशी अद्ययावत लॅब विद्यापीठात सुरु होईल की घाटी रुग्णालयात यासंबंधीचा निर्णय येत्या तीन दिवसात घेतला जाईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

शहरात लॅबसाठी दोन पर्याय

शहरात जिनोम सिक्वेन्सिंग लॅबसाठी दोन पर्याय आहेत. घाटी रुग्णालयातील प्रयोगशाळा किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पॉल हर्बर्ट सेंटर फॉर डीएनए बारकोडिंग अँड बायोडायव्हर्सिटी स्टडीज ची प्रयोगशाळा. या दोन्हीपैकी एका केंद्रावर जिनोम सिक्वेन्सिंग तपासणी सुविधा सुरु करण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे. याची चाचपणी करण्यासाठी प्रशासनाने एक समितीही स्थापन केली आहे. डॉ. वर्षा रोटे, विद्यापीठातील सदर प्रयोगशाळा विभागाचे प्रमुख डॉ. गुलाब खेडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांचा या समितीत समावेश आहे. ही समिती पुढील तीन दिवसात अहवाल देईल आणि त्यानंतर लॅबची जागा निश्चित होईल.

विद्यापीठात आधीपासूनच जिनोम सिक्वेन्सिंग

दरम्यान, विद्यापीठातील डीएनए बार कोडिंग आणि बायोडायव्हर्सिटी स्टडीज सेंटरमध्ये 2017 पासूनच अत्याधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध आहे. येथे सुमारे चार कोटींच्या मशीन्स आहेत. येथे आधी डॉल्फिन ब्लाइंड स्नेक, नोवासिक, देवणी, आहेर, मांगूर, कटला, रोहू आदी जीवांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले आहे. शिवाय ब्रेस्ट कॅन्सर रुग्णांच्या ट्यूमरवरदेखील संशोधन करण्यात आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही डेल्टा प्लसचे जिनोम सिक्वेन्सिंग करून जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर करण्यात आला होता. त्यामुळे याच प्रयोगशाळेला समितीचा कौल मिळू शकतो, अशी चर्चा आहे.

इतर बातम्या-

ओमिक्रॉनचा धोका वाढला, महाराष्ट्रातील निवडणुकाही बारगळणार?; सभागृहातही चर्चा

Shakti Act: पीडितेलाच अपराधी समजणारी वागणूक आधी बदलली पाहिजे, आमदार नमिता मुंदडा यांची सूचना!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.