Osmanabad | देव नाही, मंदिराचा अख्खा गाभाराच पाण्यात ठेवला, उस्मानाबादेत पावसासाठी ग्रामस्थांचं अनोखं साकडं…
लवकर पाऊस पडू दे...पेरणी होऊ दे व बळीराजाचे राज्य येऊ दे, असे साकडे यावेळी ग्रामस्थांच्या वतीने घालण्यात आले.
उस्मानाबाद: कोणी खुर्चीसाठी तर कोणी संपत्तीसाठी देव पाण्यात ठेवतात. मात्र पाऊसच (Rain) पडत नसल्याने हवालदिल झालेल्या उस्मानाबादेतल्या (Osmanabad) गावकऱ्यांनी अख्खा मंदिराचा गाभाराच पाण्यात ठेवला. यासाठी शेकडो घागरी पाणी आणून महादेवाच्या गाभाऱ्यात ओतलं. सारोळा (sarola) येथे ग्रामस्थांच्या वतीने पावसासाठी ग्रामदैवत श्री महादेव पिंडीसह संपूर्ण गाभारा पाण्यात ठेवण्यात आला आहे. भल्या पहाटे चिमुकल्यासह तरुण व ग्रामस्थांनी एकत्र येत टँकर व बोअरचे पाणी खांद्यावर घागर घेऊन श्री महादेव पिंड गाभारा पाण्याने भरला.
महादेव मंदिरात घागरी आणून पाणी भरलं…
सारोळा येथील श्री महादेव मंदिरात सोमवारी पहाटेपासूनच महादेव पिंड पाण्याने भरण्यास सुरुवात करण्यात आली. पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी पाऊस झाला नसल्याने पेरण्याही खोळंबल्या आहेत.
Osmanabad | देव नाही, मंदिराचा अख्खा गाभाराच पाण्यात ठेवला, उस्मानाबादेत पावसासाठी सारोळा ग्रामस्थांचं अनोखं साकडं… pic.twitter.com/JzQ4Qq58oo
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 5, 2022
महागडी खते- बियाणे खरेदी करून ठेवली आहेत. शेतीची मशागत करून चाढ्यावर मुठ धरण्यासाठी बळीराजा सज्ज झाला आहे. मात्र वरूणराजाने पाठ दाखवली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी हैराण झाले आहेत. दुष्काळातून मुक्ती मिळावी, पाऊस पडून पेरण्या व्हाव्यात, गावातील ग्रामदैवत महादेवाची पिंड व संपूर्ण गाभारा चक्क पाण्याने भरून देवालाच पाण्यात ठेवण्यात आले.
उस्मानाबादेत सारोळा ग्रामस्थांनी पावसाच्या मागणीसाठी मंदिराचा गाभाराच पाण्यात ठेवला pic.twitter.com/An38ibTVxy
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 5, 2022
विशेष म्हणजे हजारो घागरी पाणी चक्क खांद्यावर आणुन पिंडीसह गाभारा पाण्याने भरण्यात आला. लवकर पाऊस पडू दे…पेरणी होऊ दे व बळीराजाचे राज्य येऊ दे, असे साकडे यावेळी ग्रामस्थांच्या वतीने घालण्यात आले.