एअर इंडिया कर्मचाऱ्यास मारहाण, उस्मानाबादचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांना दिलासा, देशभरात गाजलेले प्रकरण!

उस्मानाबादचे शिवसेनेचे (Shiv Sena) माजी खासदार रवींद्र गायकवाड (Ravindra Gaikwad) यांची एअर इंडिया कर्मचाऱ्यास मारहाण केल्याच्या प्रकरणात 2 कलमातून दिल्ली कोर्टाने सुटका केली आहे. गायकवाड यांच्यावर आता कलम 355 नुसार खटला चालवला जाणार आहे.

एअर इंडिया कर्मचाऱ्यास मारहाण, उस्मानाबादचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांना दिलासा, देशभरात गाजलेले प्रकरण!
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 11:28 AM

उस्मानाबादः  उस्मानाबादचे शिवसेनेचे (Shiv Sena) माजी खासदार रवींद्र गायकवाड (Ravindra Gaikwad) यांची एअर इंडिया कर्मचाऱ्यास मारहाण केल्याच्या प्रकरणात 2 कलमातून दिल्ली कोर्टाने सुटका केली आहे. गायकवाड यांच्यावर आता कलम 355 नुसार खटला चालवला जाणार आहे. 2 कलमातून मुक्ताता केल्याने गायकवाड यांना दिलासा मिळाला आहे. एअर इंडिया (AIR India) कर्मचाऱ्यास मारहाण प्रकरण नंतर उस्मानाबादचे रवींद्र गायकवाड देशभर चर्चेत आले होते. त्यानंतर गायकवाड यांच्यावर विमान प्रवास बंदी व प्रसार माध्यमांचा पाठलाग सोडविण्यासाठी गायकवाड यांनी केलेले वेशांतर चांगलेच गाजले होते. या प्रकरणी दोन आरोपांतून दिल्ली सत्र न्यायालयाने त्यांची सुटका केली आहे. तर एका आरोपप्रकरणी अद्याप सुनावणी झालेली नाही.

काय घडलं होतं तेव्हा?

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी मारहाण केली नंतर एअर इंडियाचे कर्मचारी आणि रवींद्र गायकवाड यांच्यामधल्या वादाचा व्हि़डिओ व्हायरल झाला होता. बिझनेस क्लासचं तिकीट असूनही मला इकोनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आले. याचा जाब मी त्या कर्मचाऱ्याला विचारला असता, त्याने मला दाद दिली नाही. मला अपशब्द वापरले आणि त्यानंतर आपण मारहाण केल्याचे गायकवाड यांनी त्यावेळी सांगितले होते. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे अन्याय सहन करणारा नाही, गप्प बसायला मी भाजप खासदार नाही असे त्यांचे वक्तव्य त्यावेळी चांगलेच गाजले होते, या प्रकरणा नंतर ते देशभर प्रकाशझोतात आले होते. शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमानप्रवास करण्याची बंदी एअर इंडियाने घातली होती त्यानंतर ती मागेही घेतली होती.

कोणत्या आरोपांतून सुटका?

मार्च 2017 साली बिजनेस क्लासचे तिकीट दिले नाही, म्हणून खासदार रवी गायकवाडांकडून एअर इंडिया कर्मचाऱ्यांस विमानातच चपलेने प्रकरण करण्यात आली होती. गायकवाड हे पुण्याहून दिल्लीला जात होते. या घटनेनंतर त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र त्यातील कलम 308 ( सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे) आणि कलम 201 ( पुरावे नष्ट करणे, खोटी माहिती देणे ) या आरोपातून रवींद्र गायकवाड यांची दिल्लीच्या कोर्टाने मुक्तता केली आहे. पण कलम 355 (अनादर करत अकारण हल्ला करणे ) नुसार रवी गायकवाड हे सकृतदर्शनी दोषी दिसत असल्याचे मत नोंदवीत या कलमानव्ये खटला चालणार आहे, असे कोर्टाने स्पष्ट केले.

इतर बातम्या-

Cotton Crop: इतिहासात पहिल्यांदाच पांढऱ्या सोन्यानं कात टाकली, व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा, शेतकऱ्याला आनंदाचं भरतं!

औरंगाबाद जि.प सभापतींनी मागितली 5% दलाली, खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांकडे काय तक्रार केली?

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.