आमची बिल्ली आम्हालाच म्याव करते, संजय शिरसाटांनी सांगितली शिवसेनेची परिस्थिती
शिवसेना प्रमुखांनी मला आमदार केलं. माझी लायकी नसताना मी आज आमदार आहे.
दत्ता कानवटे, TV9 मराठी, प्रतिनिधी, औरंगाबाद : येथे शिंदे गटाचा मेळावा पार पडला. यावेळी शिंदे गटाचे संजय शिरसाट म्हणाले, दंगली होत होत्या. न्यायालयात जाऊन बसायचो. साक्षीदारांकडं बघायचो. साक्षीदार घाबरायचा. उलटीपुलटे साक्ष देऊन जायचे. ही शिवसेनेची आधीची परिस्थिती होती. आता उलटी परिस्थिती आहे. एखाद्या कार्यकर्त्यानं आवाज दिला तरी हा जिल्हा एका ठिकाणी यायचा. आमच्याकडं वाकड्या नजरेनं पाहायची कुणाची हिंमत नव्हती. आज आमचा बिल्ली आम्हालाच म्याव करते.
संजय शिरसाट यांनी एक किस्सा सांगितला. एक माणूस घोषणा देत होता. दुसरा माणूस त्याला पेढा भरवत होता. तिसरा माणूस फोटो काढत होता. अशी व्हिडीओ क्लीप आहे. चंद्रकांत खैरे घोषणा देत आहेत. दुसरा त्यांना पेढा घालतो. काय हा तमाशा आहे. सावजी फोटो काढतो.
माझी लायकी नसताना मी आमदार
शिवसेना प्रमुखांनी मला आमदार केलं. माझी लायकी नसताना मी आज आमदार आहे. संदीपान भुमरेंची लायकी नसताना ते मंत्री आहेत. यात कुणाचा हात असेल तर बाळासाहेब ठाकरेंचा. आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता की, निवडून येऊ, अशी आठवण त्यांनी काढली.
संजय शिरसाट म्हणाले, मी तीन वेळा आमदारकी लढली. पण, एखादी कार्नर सभा घेतल्याचा फोटो दाखवा. आपल्याला चिंता ही आपल्या मतदाराची असली पाहिजे. माझ्याविरोधातही बंडखोर होता. पण, लोकांची कामं केली. म्हणून त्यांनी मला 42 हजारांची लीड दिली.
न्यायालयात केसेस. संभाजीनगरमध्ये केसेस. या केसेस सांभाळणारे वकील सायकलनं फिरायचे. त्यांनी स्कूटर घेऊन दिले. तेव्हा बाळासाहेब म्हणाले, त्याला स्टँडर्स भिकारी केलंत का? गाडीच पेट्रोलची व्यवस्था केलीत का. राहायला घर आहे की, नाही, याची चौकशी बाळासाहेबांनी केली होती.
कुणाबद्दल बोलता याचं भान ठेवा
काँग्रेस एक सुस्त अजगर आहे. खाल्ल की, पडले की ते उठतचं नाहीत. तुम्हाला काय बोलायचं. कुणाबद्दल बोलता, याचं भान ठेवा, असा सल्ला चंद्रकांत खैरे यांना दिला.
बाळासाहेबांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जायचं नाही, असं सांगितलं होतं.तरीही सत्तेसाठी त्यांच्यासोबत जात असाल तर त्यासारखं मोठं पाप नाही, असा घणाघात संजय शिरसाट यांनी केला.