परभणी जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर, राजकीय पक्ष तयारीला लागले
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. PDCCB election Programme declared
परभणी: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या जिल्हा बँकांच्या निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत दाखल झालेली याचिका फेटाळलीय. (Parbhani District Central Co Operative Bank Election Programme Declared)
परभणी जिल्हा बँक निवडणूक कार्यक्रम
परभणी जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून प्रशासनाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय.15 ते 22 फेब्रुवारी दरम्यान नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत. 23फेब्रुवारील अर्जाची छाननी होणार आहे.24 रोजी वैध नामनिर्देशनपत्राची यादी जाहीर केली जाईल. याबरोबरच 24 फेब्रुवारी ते १० मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. उमेदवारांना 12 मार्चला निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. 21 मार्चला मतदान आणि 23 मार्चला निकाल घोषीत केला जाणार आहे..
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानं राजकीय पक्ष लागले तयारीला
राज्यातील इतर जिल्हा बँक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकी विरोधात औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली. जिल्हा बँकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षांनी पॅनल जुळवण्यासाठी तयारी सुरु केलीय.
जिल्हा बँकेची मतदान केंद्र
परभणी जिल्हा बँकेच्या कार्यक्षेत्रात दोन जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यामुळं परभणी आणि हिंगोलीमध्ये मतदान केंद्र असतील. परभणी आणि हिंगोली असं मिळून एकूण 15 केंद्रांवर मतदान होईल. परभणी, पूर्णा, जिंतूर, मानवत, पाथरी, सेलू, सोनपेठ, गंगाखेड आणि पालम येथे तर हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव येथे मतदान केंद्र असतील.
जिल्हा बँकेची निवडणूक कशी होते?
जिल्हा बँकाच्या निवडणुकीत प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती संस्था, कृषी पणनं संस्था, शेतमाल प्रक्रिया संस्था यासह इतर जिल्हा बँकेशी निगडित इतर मतदारसंघासाठी निवडणूक होते. परभणी जिल्हा बँकेत 1 हजार 569 मतदार मतदान करणार आहेत.
ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकाल 31 मार्चला
दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बहुप्रतिक्षित निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. दि ठाणे जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी 30 मार्च रोजी मतदान होणार असून दि. 26 फेब्रुवारीपासून ते 4 मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. दाखल झालेल्या अर्जांची छानणी 05 मार्चला होणार आहे. 8 ते 22मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. 21 जागांसाठी 30 मार्चला मतदान होणार असून 31 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
जळगाव अपघातातील 15 मृत मजुरांच्या नातेवाईकांना ठाकरे सरकारकडून दोन लाखांची मदत https://t.co/qJpeAzS3ud #CM #uddhavThackeray #Jalgaon #Truck #Accident
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 15, 2021
संबंधित बातम्या:
काँग्रेसच्या एकमेव खासदाराने करुन दाखवलं, यवतमाळ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची खुर्ची समर्थकाला
कराड जनता बँक कोणी बुडवली? बॅक खातेदार राजेंद्र पाटलांचे गंभीर आरोप
(Parbhani District Central Co Operative Bank Election Programme Declared)