Good News | परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा, 682 कोटींचा निधी मंजूर, नागरिकांचा जल्लोष!
मागील सहा वर्षांच्या जनाआंदोलनाचे हे यश असल्याची प्रतिक्रिया परभणीचे खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी व्यक्त केली. नागरिक आणि आंदोलकांनी बुधवारी रात्री फटाके फोडून हा आनंद साजरा केला.
औरंगाबादः MBBS चं शिक्षण (MBBS Course) घेऊन डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या सहा वर्षांपासून परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Parbhani Government Medical Collage) उभारण्यासाठी करण्यासाठी जनआंदोलन सुरु होते. या आंदोलनाला अखेर यश आले असून राज्य सरकारने मंजूरी दिलेल्या या महाविद्यालयाला 682 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील सहा वर्षांच्या जनाआंदोलनाचे हे यश असल्याची प्रतिक्रिया परभणीचे खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी व्यक्त केली. नागरिक आणि आंदोलकांनी बुधवारी रात्री फटाके फोडून हा आनंद साजरा केला.
खासदारांच्या आंदोलनाला यश
परभणीत हक्काचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असावं, ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती. हे महाविद्यालय उभे रहावे, यासाठी परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली दोन वेगवेगळ्या टप्प्यांत जनआंदोलन करण्यात आले होते. त्याला आता यश आले असून हा निधी दिल्याबद्दल खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना फायदा
येत्या चार वर्षात हे महाविद्यालय बांधकाम पूर्ण होणार असून येथील प्रवेश क्षमता 100 एवढी असेल. येथील रुग्णालयात 403 खाटा असतील. परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला निधी मंजूर झाल्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना जास्त फायदा होणार, नागरिकांना आरोग्याच्या उच्च प्रतीच्या सुविधा उपलब्ध होतील, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा काँग्रेसचे संपर्कमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली.
#महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय उभारण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे परभणीकरांची जुनी मागणी पूर्ण झाली असून, काँग्रेसचा परभणी जिल्ह्याचा संपर्क मंत्री या नात्याने मी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व मंत्रिमंडळाचा आभारी आहे.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) March 2, 2022
जिल्हा तिथे वैद्यकीय महाविद्यालय
कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला होता. त्यामुळे जिल्हा तिथे वैद्यकीय महाविद्यालय उभे करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. सध्या महाराष्ट्रात 57 वैद्यकीय महाविद्यालय असून 8910 एमबीबीएसच्या जागा आहेत. कोरोना महामारीच्या संकटातून धडा घेतल्यानंतर जिल्हा तिथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले तर राज्यात तब्बल 2600 एमबीबीएस च्या जागा वाढणार आहेत. त्यात नवीन सुरू होणाऱ्या महाविद्यालयात 1800 आणि विद्यमान महाविद्यालयात सुधारणा केल्यास 800 जागा वाढणार आहेत.
इतर बातम्या-