Parbhani | मृत्यूचं असंही रुप कॅमेऱ्यानं टिपलं.. क्षणात होत्याचं नव्हतं..परभणीत लग्नात गाणं म्हणताना महिला कोसळली अन्…
परभणीच्या पाथरी रोड येथील राजलक्ष्मी मंगल लॉन्स येथे एका लग्नसोहळ्यात गाणं म्हणत असलेल्या संगीता गव्हाणे यांचा अशा प्रकारे भयंकर मृत्यू झाला.
परभणीः जगण्याचा उत्सव साजरा करताना डोळ्यादेखत मृत्यू यावा आणि क्षणात होत्याचं नव्हतं व्हावं… अशीच दुर्दैवी घटना परभणीत (Parbhani) घडली (Woman Death). लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला सुखद क्षण असतो. या क्षणाला अनेकांना आवर्जून बोलावलं जातं. डान्स-गाण्यांचे कार्यक्रम होतात. वऱ्हाडी मंडळी तर तल्लीन होऊन डान्स (Dance) करतात. परभणीतही डीजेच्या तालावर अशाच एका लग्नाची मिरवणूक सुरु होती. नवरदेवाचे नातेवाईक-मित्रांचा जल्लोष सुरु होता. या सर्वांना साथ होती गाण्याची. एक महिला गाण्याची साथ देत होती. खेळताना रंग बाई होळीचा.. हे गाणं सुरु असतानाच अचानक गाणं थांबलं… महिला जागीच कोसळली…
VIDEO : Parbhani Viral Video | लग्न वऱ्हाडीत गाणं म्हणताना महिलेचा मृत्यू झाला, व्हिडीओ व्हायरल#parbhani #marriage #death #ladies #singing pic.twitter.com/PlSMnMqKOZ
हे सुद्धा वाचा— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2022
महिलेला हृदयविकाराचा झटका
गाणं म्हणणाऱ्या या महिलेचा व्हिडिओ कुणीतरी शूट करत होतं. त्यामुळे तिच्यावर ओढवलेला मृत्यूचा प्रसंग कॅमेऱ्यात स्पष्टपणे टिपला गेलाय. गाणं म्हणतानाच अचानक ही महिला थांबली. खाली कोसळली. लग्नातील जमलेले सगळे लोक धावत तिच्याजवळ गेले. तिला नेमकं काय झालंय, हे पाहू लागले. मात्र तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. नागरिकांनी तत्काळ तिला हॉस्पिटलमध्ये नेलं, मात्र तोपर्यंत तिने प्राण सोडले होते.
परभणीत कुठे घडली घटना?
परभणीच्या पाथरी रोड येथील राजलक्ष्मी मंगल लॉन्स येथे एका लग्नसोहळ्यात गाणं म्हणत असलेल्या संगीता गव्हाणे यांचा अशा प्रकारे भयंकर मृत्यू झाला. गाणं म्हणता असतांना अचानक खाली कोसळल्या आणि त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. क्षणात होत्याच नव्हतं झालं .परभणीच्या नानलपेठ परिसर येथे राहणाऱ्या संगीता ह्या व्यवसायाने होमगार्ड होत्या , मात्र गाणं म्हणण्याची त्यांना हौस होती. हौसेपोटी त्या गाणं म्हणायला कार्यक्रमात जायच्या. मात्र गेल्या शुक्रवारी पाथरी रोडवरील मंगलकार्यालयातला लग्न सोहळा हा त्यांच्यासाठी शेवटचा कार्यक्रम ठरला. आपल्या सुरेल आवाजात गाणं म्हणायला सुरुवात केली. आणि क्षणातच त्या खाली कोसळल्या . सगळ्यांनी धावपळ केली. त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.