रेल्वेच्या पीटलाइनसाठी जालन्यात 100 एकर जागा, रेल्वे संघर्ष समितीही प्रकल्पासाठी आग्रही!
रेल्वे दुरुस्ती आणि स्वच्छतेसाठीचे अतिरिक्त रुळ असलेली जागा अर्थात पीटलाइन जालन्यात होईल का औरंगाबादेत यासंबंधीचे राजकीय नाट्य सध्या सुरु आहेत. यात आता रेल्वे संघर्ष समितीनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
जालनाः जालना हे भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असून येथे निजामकाळापासूनच रेल्वेला मोठे महत्त्व आहे. येथे रेल्वेच्या पीटलाइन उभारणीसाठी 100 एकर जागा उपलब्ध असून पीटलाइनची उभारणी इथेच झाली पाहिजे, अशी आग्रही भूमिका रेल्वे संघर्ष समितीतर्फे मांडण्यात आली. रविवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष गणेशलाल चौधरी यांनी ही भूमिका मांडली. रेल्वे दुरुस्ती आणि स्वच्छतेसाठीचे अतिरिक्त रुळ असलेली जागा अर्थात पीटलाइन जालन्यात होईल का औरंगाबादेत यासंबंधीचे राजकीय नाट्य सध्या सुरु आहेत. यात आता रेल्वे संघर्ष समितीनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
औरंगाबाद की जालन्यात पीटलाइन?
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब गानवे यांनी जालन्यात पंधरा दिवसांपूर्वी किसान रेल्वेच्या उद्घाटनप्रसंगी पीटलाइन जालन्यातच होईल, असे वक्तव्य केले होते. मात्र ही पीटलाइन औरंगाबादेत होत असून चिकलठाण्यातील जमीन यासाठी निश्चित केल्याची घोषणा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केली होती. त्यानंतर दानवे यांच्या जालन्यातील पीटलाइनच्या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यातच खासदार फौजिया खान यांनी रेल्वेची पीटलाइन औरंगाबादेतच होईल, अशी मंजूरी दिलेले रेल्वे मंत्रालयाचेच पत्र दाखवले. त्यामुळे हा वाद आणखीच पेटला. मात्र फौजिया खान यांना या प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेशलाल चौधरी यांनी दिली आहे.
इतर बातम्या-